तुम्ही त्या बाईची तक्रार देत असाल तर तुम्हाला वाचवायला आम्ही येणार नाही कारण आमची कधीही बदली होऊ शकते – सहाय्यक पोलीस निरीक्षक महेंद्र शहारे
प्रतिनिधी मोहाडी:- दिनांक १४-११-२०२३ रोजी वरठी येथील पत्रकार अमर वासनिक यांच्या वर वरठी पोलीसांचे खबरी गांजा तस्कर मयंक मुन्ना यादव/गणवीर (वय २०) याने दोन धारदार तलवारींनी हमला केला. तसेच अमर वासनिक यांचे कार्यालय अमर कॉम्प्युटर सेंटर मध्ये आरोपी मयंक ने तोडफोड केली आणि आपल्या आईला बोलावून पुन्हा तोडफोड केली. तोडफोड करू नये व आपल्या खाजगी मालमत्तेची सुरक्षा व्हावी या हेतूने आरोपी मयंक मुन्ना गणवीर/यादव (वय २०) तसेच त्याची आई मोनि मुन्ना गणवीर/यादव वय (४४) यांना प्रतिबंधित करायला पत्रकार अमर वासनिक तसेच त्यांचे वडील भालचंद्र वासनिक पुढे सरसावले असता इतक्यात पोलीस गाडी आली. यावर अमर वासनिक यांनी वरठी पोलिसांना जखमी अवस्थेत पोलीस स्टेशन किंवा दवाखान्यात नेण्यास विनंती केली असता पोलिसांनी स्पष्ट नकार दिला. वरठी पोलिसांसमोर गांजा तस्कर हे अमर वासनिक यांना अश्लील शिवीगाळ करीत होते तरी वरठी पोलीस गांजा तस्करांना काहीच म्हणत नव्हते. तुलाच जावे लागेल असे सांगितल्यामुळे अमर वासनिक यांना त्यांचे वडील सर्वप्रथम वरठी येथील दवाखान्यात घेऊन गेले तोपर्यंत अमर वासनिक यांची खाजगी मालमत्ता अमर कॉम्प्युटर सेंटर हडपण्याच्या हेतूने वरठी पोलिसांनी आरोपी मोनी मुन्ना गणवीर/यादव (४४) हिच्या हातून अमर वासनिक तसेच त्यांचे वडील भालचंद्र वासनिक यांच्यावर स्त्री लज्जा भंगाचा गुन्हा दाखल केला. व अमर वासनिक यांचा आवाज दाबला. त्या रात्री १०:२० वाजता गांजा तस्करांनी अमर भालचंद्र वासनिक यांच्या निवासस्थानाची तब्बल २० मिनिटे तोडफोड केली.
त्यानंतर संबंधित गांजा तस्कर तसेच गांजा तस्कर मयंक मुन्ना यादव ची आई मोनी मुन्ना यादव/गणवीर यांनी अमर वासनिक यांना रस्त्यावरून जाता येता अश्लील शिवीगाळ करून टॉर्चर करणे चालू केले.
दिनांक ३१-१२-२०२३ रोजी मयंक मुन्ना यादव ने अमर वासनिक यांना संविधान चौक वरठी येथे रात्री ०८:१२ वाजता अश्लील शिवीगाळ करून जिवे मारण्याची धमकी दिली.
दिनांक ०८-०१-२०२४ रोजी हनुमान वॉर्ड, वरठी येथे महाप्रसाद कार्यक्रमाकडे रात्री ०८:३० च्या दरम्यान अमर वासनिक जात असताना आरोपी मोनी मुन्ना यादव/गणवीर हिने पत्रकार अमर वासनिक यांना, हा चालला ******, मायहेप्या, मादरचोद, भडवा, अश्या प्रकारच्या नेहमी प्रमाणे अश्लील भाषेत सभ्य पुरुष लज्जेला बाधा पोहोचेल अश्या शब्दांत अश्लील शिवीगाळ करून ताने मारले.
यापूर्वी सुध्दा भोसडाचोद्या या अश्लील भाषेत ताने मारत असल्याने अमर वासनिक हे पोलीस स्टेशन वरठी येथे तक्रार करायला गेले असता वरठी पोलिसांनी चकलस बाजी केली. दुसऱ्या दिवशी सुद्धा दिनांक ०९-०१-२०२४ रोजी अमर वासनिक यांनी आपली कार्यालयीन कामे आटोपून रात्री पोलीस स्टेशन वरठी येथे तक्रार द्यायला गेले असता वरठी पोलिसांनी चकलसबाजी केली. नंतर नव नियुक्त सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री. महेंद्र शहारे यांनी अमर वासनिक यांना स्पष्ट शब्दांत खडसावले की जर तुम्ही तक्रार देत असाल तर तुमच्या जीवाला काही बरे वाईट झाले तर याला जिम्मेदार आम्ही अर्थात वरठी पोलीस जिम्मेदार राहणार नाही कारण आम्ही बदली करून चालले जाऊ आमच्या नंतर दुसरा अधिकारी येईल व नव्याने कामकाज बघेल.
त्यामुळे अमर वासनिक हे घाबरले व पोलीस स्टेशन वरठी येथून अमर वासनिक हे आल्या पावली आपल्या घरी परतले.
यावरून हे सिद्ध होते की गांजा, चरस, ब्राऊन शुगर, हेरॉईन ची तस्करी तसेच ४२० ची कामे करणाऱ्या लोकांचे वरठी पोलीस स्टेशन वर किती वजन आहे व किती दबदबा आहे हे यावरून लक्षात येते.
काहीही झाले तरी गणवीर परिवाराला अमर वासनिक हे आपली खाजगी मालमत्ता हडपू देणार नाहीत.
अमर वासनिक यांच्या विरोधात चार्जशीट दाखल करणाऱ्या पोलिसांनी अमर वासनिक यांना तुरुंगवास व्हावा याकरिता सरकारी वकीलाला दहा लक्ष रुपयांची रिश्वत दिली असल्याची गोपानीय माहिती आहे.