तुमसर शहरातील काही भागात चोरीची मालिका गोवर्धन विनोबा व श्रीराम नगर मध्ये चोरांचे लक्ष केंद्रित पोलिसांचा तपास सुरू
पोलीस योद्धा न्यूज नेटवर्क वृत्तसंकलन तुमसर:-
तुमसर शहरात वीस ते बावीस दिवसांपूर्वी पाच घरफोड्या झाल्या होत्या. त्याची शाही पुसत नाही तर पुन्हा चोरांनी शुक्रवारच्या मध्यरात्री सुमारास भंडारा मार्गावरील विनोबा नगरातील सडकेवरील तीन दुकाने फोडल्याची घटना घडली असून काही नगरांमध्ये चोरांनी लक्ष केंद्रित केल्याचे सदर मालिकातून समजल्या जात आहे. पोलिसांचा तपास सुरू आहे.
तुमसर शहरात जुलै महिन्यात घरफोडी पंधरा दिवसाच्या अवधीतच झाली नंतर पुन्हा भंडारा मार्गावरील साईनाथ ट्रेडर्स, साईनाथ फर्निचर शॉप व परमात्मा एक किराणा दुकानाचे लोखंडी शर्टर फोडून आत प्रवेश केला. त्यात काही चे कागदपत्रे गेली तर किराणा दुकानातून रोख ३००० रुपये नेल्याचे सांगण्यात आले. भंडारा मार्ग सतत रात्री बे-रात्री सुरू असतो. यापूर्वी गोवर्धन व श्रीरामनगरात यात्र पद्धतीने समोरील दार तोडून प्रवेश केला. त्यामध्ये काही घरांमधून रोख व ऐवज चोरीला गेला तर काही घरात चोरांच्या हातीच काही लागले नाही. चोरीची मालिका घडत आहे, हे एकाच टोळीतील असावे असा संशय व्यक्त होत आहे. खात्याचे काही सीसीटीव्ही कॅमेरे सुरू आहेत परंतु नगरपालिकेने जागोजागी लावलेले कॅमेरे काही चोरीला गेले तर काही बंद पडले. मोठे व्यावसायिकांना किंवा सभागृहा वाल्यांना कॅमेरे लावण्याची खात्याने ताकीद दिली. परंतु त्या फर्मानाला व्यवसायिकांनी जुमानले नाही. बऱ्याच मोठ्या शहरात नगर प्रशासनाकडून शहर सुरक्षित ठेवण्याच्या दृष्टीने पुढाकार घेतला आहे. पण सदर शहरात तस दिसून पडत नाही. ही शोकांतिका समजा. वृत्तलीहीपर्यंत तिघांपैकी एका दुकान मालकाने पोलीस ठाण्यात नोंद केली आहे. तुमसर पोलिसांचा तपास सुरू असून वेगवेगळ्या ठिकाणावरून पोलीस सीसीटीव्ही फुटेजचा आधार घेत आहेत. सदर टोळी मध्यप्रदेश किंवा उत्तरप्रदेश प्रांतातील असावी असा अंदाज बांधला जात आहे. तुमसर पोलिसांकडून दीड महिन्यापूर्वी रात्रीला सुरू असणाऱ्या व्यवसायिकांना ११:०० वाजे नंतरचे सक्तीचे निर्बंध घालण्यात आले आहेत. त्यादरम्यान घरफोडी किंवा चोरीची घटना घडल्याची नोंद नसल्याची विश्वासनीय सूत्रांकडून समजले. परंतु राजकीय माशी शिंकली, त्यामुळे खात्याला सक्तीचे निर्बंध काढावे लागले. गुन्हा करणारा व्यक्ती कधीही वर्दळीचा आसरा घेतात हे विशेष.