BREAKING NEWS:
क्राइम न्यूज़ भंडारा महाराष्ट्र हेडलाइन

तुमसर–खैरलांजी मार्गावरची ओरड गिळणारी रात्र; अल्पवयीन मुलीला पळवणाऱ्या नराधमास 5 वर्षांचा सश्रम कारावास

Summary

तुमसर तालुक्यातील आझाद नगर. 18 एप्रिल 2023. रात्रीची वेळ साधारण साडेआठची. गावात दिवे टिमटिमत होते… आणि त्या अंधुक प्रकाशात 45 वर्षीय संजय रहांगडाले, डोंगरला येथील, एका अल्पवयीन मुलीकडे नजर रोखून उभा होता. फूस लावली. भीतीने गोंधळलेल्या मुलीला मोटारसायकलवर बसवले. आणि […]

तुमसर तालुक्यातील आझाद नगर. 18 एप्रिल 2023. रात्रीची वेळ साधारण साडेआठची.
गावात दिवे टिमटिमत होते… आणि त्या अंधुक प्रकाशात 45 वर्षीय संजय रहांगडाले, डोंगरला येथील, एका अल्पवयीन मुलीकडे नजर रोखून उभा होता.

फूस लावली.
भीतीने गोंधळलेल्या मुलीला मोटारसायकलवर बसवले.
आणि क्षणात ती आझाद नगरच्या गल्लीतून गायब झाली.

त्या रात्री तुमसर–खैरलांजी शेतशिवारात फक्त थंड वारा नव्हता—तिथे एका मुलीची हुंदकी दडपली जात होती. आरोपीने चाकूचा धाक दाखवत वारंवार लैंगिक अत्याचाराचा प्रयत्न केला. अंधार दाटत गेला, आणि तिचे आवाज त्या काळोखात हरवले.

फिर्यादी ओमप्रकाश नेवारे यांनी दिलेल्या तक्रारीवरून तुमसर पोलीस ठाण्यात कलम 363, 366(A), 376(A)(B), 506 भादंवि सह POCSO कलम 4 व 6 नुसार गुन्हा नोंदला गेला.
गुन्हा गंभीर… आणि तपास आणखी तीव्र.

भक्कम तपास: आरोपीचे पाऊलखुणा उलगडत गेल्या

पोलीस निरीक्षक निलेश ब्राम्हणे यांनी घटनेच्या प्रत्येक तुकड्याला पुराव्याची धार लावली.
शेतशिवारातील चिन्हे, साक्षीदारांचे म्हणणे, पीडितेचे बयान—सगळे एकत्र शिवून त्यांनी आरोपीचा मुखवटा पूर्ण उघड केला. दोषारोपपत्र न्यायालयात दाखल झाले आणि केस क्रमांक 58/2023 न्यायालयात पोहोचला.

सरकारी वकील दुर्गा तलमले यांनी न्यायालयात पुराव्यांच्या सलग मालिकेद्वारे तो काळाकुट्ट क्षण पुन्हा जिवंत केला. साक्षीदारांच्या साक्षांनी आरोपीच्या कृत्यांना कोणतीही पळवाट राहिली नाही.

न्यायाधीशांचा निर्णय:

08 डिसेंबर 2025 रोजी सत्र न्यायाधीश भारती काळे यांनी निर्णय सुनावताच न्यायालयात शांतता पसरली—

POCSO अन्वये 5 वर्षांचा सश्रम कारावास + 10,000 रुपये दंड
दंड न भरल्यास 6 महिने आणि अतिरिक्त कारावास

कलम 363 भादंवि – 1 वर्ष सश्रम कारावास + 5,000 रुपये दंड
दंड न भरल्यास 3 महिने अतिरिक्त कारावास

न्यायालयाने स्पष्ट शब्दांत म्हटले—
“अल्पवयीन मुलीवर नजर टाकणाऱ्या हातांना कायद्याची लोखंडी मूठ सोडणार नाही.”

न्याय मिळवणारा पोलिसांचा धडाडीचा पाठपुरावा

पोलीस अधीक्षक नूरुल हसन, अपर पोलीस अधीक्षक निलेश मोरे, उपविभागीय अधिकारी शिवम विसापुरे, ठाणेदार सुभाष बारसे—सगळ्यांच्या समन्वयातून हा तपास प्रकाशाच्या वेगाने पुढे गेला.
दोषसिद्धी कक्ष आणि कोर्ट पॅरवी अंमलदार विशाल खंगार यांनी अंतिम टप्प्यात आरोपीसाठी प्रत्येक दार बंद केले.

संकलन:- अमर वासनिक, न्यूज एडिटर, पोलिस योद्धा न्यूज नेटवर्क

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *