BREAKING NEWS:
क्राइम न्यूज़ भंडारा महाराष्ट्र हेडलाइन

तुमसरमध्ये रेती तस्करांचा ‘खेळ’ खल्लास! एलसीबीचा मध्यरात्री छापा; ८ लाखांच्या ‘सोनालिका’सह तस्कर पोलिसांच्या जाळ्यात ​तामसवाडी परिसरात स्थानिक गुन्हे शाखेचा दणका; मध्यरात्री २ वाजता रचला थरारक सापळा!

Summary

तुमसर (भंडारा): भंडारा जिल्ह्यात रेती माफियांनी कितीही डोके वर काढले, तरी ‘खाकी’ची नजर त्यांच्यावर कायम आहे. तुमसर तालुक्यातील तामसवाडी परिसरात स्थानिक गुन्हे शाखेने (LCB) मध्यरात्रीच्या सुमारास एका मोठ्या कारवाईला अंजाम दिला. विनापरवाना रेतीची चोरी करून वाहतूक करणाऱ्या एका निळ्या रंगाच्या […]

तुमसर (भंडारा):
भंडारा जिल्ह्यात रेती माफियांनी कितीही डोके वर काढले, तरी ‘खाकी’ची नजर त्यांच्यावर कायम आहे. तुमसर तालुक्यातील तामसवाडी परिसरात स्थानिक गुन्हे शाखेने (LCB) मध्यरात्रीच्या सुमारास एका मोठ्या कारवाईला अंजाम दिला. विनापरवाना रेतीची चोरी करून वाहतूक करणाऱ्या एका निळ्या रंगाच्या ‘सोनालिका’ ट्रॅक्टरला पोलिसांनी फिल्मी स्टाईलने पाठलाग करून पकडले आहे.
​मध्यरात्रीचा थरार: मुखबिराची ‘ती’ खबर ठरली मोलाची!
​दिनांक १ मार्च २०२६ ची रात्र… वेळ साधारण पहाटे २:०५ वाजताची. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक पाटील आपल्या ताफ्यासह रात्रगस्त घालत असतानाच, तामसवाडी परिसरात रेतीची अवैध वाहतूक होणार असल्याची पक्की खबर मुखबिराकडून मिळाली. वेळ न घालवता पथकाने अंधाराचा फायदा घेत तामसवाडी शिवारात सापळा रचला.
​सोनालिका ट्रॅक्टरसह तस्कर अटकेत
​काही वेळातच एक निळ्या रंगाचा ट्रॅक्टर रेती भरून वेगाने येताना दिसला. पोलिसांनी इशारा देऊन ट्रॅक्टर थांबवला. चौकशी केली असता, चालक हरीराम देवदास पांडे (वय ३४, रा. तामसवाडी) याच्याकडे रेती वाहतुकीचा कोणताही परवाना मिळून आला नाही. पोलिसांनी तात्काळ ट्रॅक्टर आणि ट्रॉली जप्त करून आरोपीला ताब्यात घेतले.
​८ लाखांचा मुद्देमाल जप्त
​या धडक कारवाईत पोलिसांनी खालील मुद्देमाल हस्तगत केला आहे:
​१) निळ्या रंगाचा सोनालिका DI 47 RX ट्रॅक्टर (विना क्रमांकाचा) व ट्रॉली: किंमत ८,००,००० रुपये.
​२) १ ब्रास रेती: किंमत ६,००० रुपये.
​एकूण जप्त माल: ८,०६,००० रुपये.
​गुन्हा दाखल, तपासाचे चक्र वेगात
​या प्रकरणी तुमसर पोलीस ठाण्यात अपराध क्रमांक ३०५/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ३०५ (ई) नुसार गुन्हा नोंदवण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस हवालदार गावंडे करत आहेत.
​पोलीस योद्धा न्यूज अलर्ट: पर्यावरणाचे नुकसान करणाऱ्या आणि शासनाचा महसूल बुडवणाऱ्या रेती चोरांविरुद्ध ही मोहीम यापुढेही अशीच कडकपणे सुरू राहणार आहे.
​ब्युरो रिपोर्ट: पोलीस योद्धा न्यूज नेटवर्क
📢 वेबमीडिया: www.policeyoddha.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *