तुकाराम मुंढेची नागपुरात पुन्हा मनपा आयुक्त पदावर नियुक्ती करा…..शिवसेनेची मागणी..
नागपूर : दक्षिण नागपूर प्रभाग 29 मधील शिवसेना उपशहर प्रमुख दिपक अशोकराव पोहनेकर यांच्या वतीने महाराष्ट्र राज्याचे मा. मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांना आपल्या स्व:हस्ताक्षरात पत्र लिहून विनंती केली आहे की, नागपुरात कोरोना विषाणू व्हायरसने व हाहाकार, थैमान माजवला आहे. गेल्या पंधरा तीन आठवडया पासून कोरोनाने खूप लोक मृत्युमुखी पडलेत. तसेच संक्रमित रुग्णाची झपाट्याने वाढ होत आहे. नागपूरची स्थिती भयंकर झाली असून या सर्व युवक कार्यकर्तेंनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांना पुन्हा नागपुरात रुजू करण्यात यावे. अशी विनंती निवेदनात केलेली आहे. नागपुर शहरातून तुकाराम मुंढे यांना मनपा आयुक्त पदावरून कमी करून त्यांची बदली करण्यात आली. जवळ जवळ पंधरा, तीन हप्ते झाले असून कोरोनाने कहर माजवला आहे. आजही नागपूरच्या जनतेला तुकाराम मुंढे साहेबांची आठवण झाली आहे. नागपूरची परिस्थिती हाता बाहेर चालली आहे. साधारण जनतेची लूट मोठ्या प्रमाणात सुरू झाली आहे. वेगवेगळ्या माध्यमातून लोकांची लूट सुरू आहे. आणि लोकांच्या जीवाशी खेळणे सुरू आहे. हा प्रकार फक्त एकच माणूस सांभाळू शकतो ते म्हणजे तुकाराम मुंढे साहेब ?
नागपूरातील सर्व जनतेची विनंती आहे की, पुन्हा नागपुरात तुकाराम मुंढे साहेबांची नियुक्ती करण्यात यावी. व नागपूरच्या जनतेला न्याय देण्यात यावा. अशी विनंती शिवसेसेनेचे उपशहर प्रमुख दिपक पोहनेकरनीं केली आहे.👆
संजय निंबाळकर
उपसंपादक
9579998535