तीर्थस्थान ग्राम चांदपुर येथे छत्रपती शिवशंभु प्रतिष्ठाण,तुमसर तर्फे सभा
Summary
स्वार्थी करमकर/महिला प्रतिनिधी दिनांक २९/०९/२०२१ ला तीर्थस्थान ग्राम चांदपुर येथे छत्रपती शिवशंभु प्रतिष्ठाण,तुमसर तर्फे सभा घेन्यात आली यात ग्रामस्थांना छत्रपती शिवशंभू प्रतिष्ठानमार्फत राबवण्यात येणार्या विविध कार्याची माहिती देण्यात आली जसे कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रम, प्रधानमंत्री कौशल्य विकास योजना, ई श्रमिक […]

स्वार्थी करमकर/महिला प्रतिनिधी
दिनांक २९/०९/२०२१ ला तीर्थस्थान ग्राम चांदपुर येथे छत्रपती शिवशंभु प्रतिष्ठाण,तुमसर तर्फे सभा घेन्यात आली यात ग्रामस्थांना छत्रपती शिवशंभू प्रतिष्ठानमार्फत राबवण्यात येणार्या विविध कार्याची माहिती देण्यात आली जसे कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रम, प्रधानमंत्री कौशल्य विकास योजना, ई श्रमिक कार्ड, कोविड-१९ मध्ये मरण पावलेल्या कुटुंबियांना आर्थिक मदत इत्यादी. छत्रपती शिवशंभु प्रतिष्ठान चे शिवकार्य, समाजकार्य आणि शाखा निर्मिती, इत्यादि बद्दल छत्रपती शिवशंभु प्रतिष्ठाण चे संस्थापक/अध्यक्ष इंजि श्री. नितिन धांडे यांनी उपस्थितांना अवगत केले. प्रतिष्ठाण चे संपर्क प्रमुख श्री. कोमल वानखेडे व चांदपुर देवस्थान लगत असलेले दुकान मालक , गावकरी इत्यादींनी सभेला हजेरी लावली.
स्वार्थी करमकर
महिला प्रतिनिधी
तालुका तुमसर