महाराष्ट्र मुंबई हेडलाइन

तासिकातत्वावर प्राध्यापकांचे मानधन वेळेवर देण्यासाठी पोर्टल विकसित करा – उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील

Summary

मुंबई, दि. ६ : राज्यातील तासिका तत्त्वावर कार्यरत असलेल्या प्राध्यापकांना वेळेवर व पारदर्शक पद्धतीने मानधन देण्यासाठी स्वतंत्र पोर्टल विकसित करण्यात यावे. या पोर्टलसाठी चांगले काम करणाऱ्या आणि तांत्रिकदृष्ट्या सक्षम कंपनीची निवड करून पोर्टल तयार करण्याचे निर्देश उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील […]

मुंबई, दि. ६ : राज्यातील तासिका तत्त्वावर कार्यरत असलेल्या प्राध्यापकांना वेळेवर व पारदर्शक पद्धतीने मानधन देण्यासाठी स्वतंत्र पोर्टल विकसित करण्यात यावे. या पोर्टलसाठी चांगले काम करणाऱ्या आणि तांत्रिकदृष्ट्या सक्षम कंपनीची निवड करून पोर्टल तयार करण्याचे निर्देश उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिले.

संचालनालयातील तासिका तत्त्वावरील प्राध्यापकांच्या मानधन वितरणासाठी पोर्टल तयार करण्याबाबत बैठक झाली. या बैठकीस उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे अपर मुख्य सचिव बी. वेणुगोपाल रेड्डी, तंत्रशिक्षण विभागाचे संचालक डॉ. विनोद मोहितकर उपस्थित होते.

उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले, प्राध्यापकांची ऑनलाईन नोंदणी, कामाचे वेळापत्रक, उपस्थिती नोंद आणि मानधन प्रक्रिया पूर्णपणे संगणकीकृत व पारदर्शक करण्यात येणार आहे. या पोर्टलमुळे मानधन वितरण प्रक्रियेत पारदर्शकता येणार असून, तासिका तत्त्वावरील प्राध्यापकांच्या सेवा नोंदींचे व्यवस्थापन देखील सुलभ होणार आहे. लवकरात लवकर पोर्टल कार्यान्वित करावे असेही त्यांनी यावेळी सांगितले.

बैठकीत तंत्रशिक्षण संचालनालयामार्फत या पोर्टलच्या प्राथमिक रचनेबाबत सादरीकरण करण्यात आले.

०००

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *