तालुकास्तरीय पाककृती स्पर्धेत सरस्वती विद्यालय अव्वल

अर्जुनी मोर:- शिक्षण विभाग पंचायत समिती अर्जुनी मोरगाव तर्फे प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजना 2024-25 तालुकास्तरीय पाककृती स्पर्धेचे आयोजन जिल्हा परिषद हायस्कूल अर्जुनी मोरगाव येथे दिनांक 14 फेब्रुवारी 2025 ला आयोजित करण्यात आली. यात तालुक्यातील अनेक शाळांच्या पालकांनी सहभाग घेतला यात सरस्वती विद्यालयातील वर्ग नववीचे पालक सौ. अर्चना दिनेश शहारे यांनी सरस्वती विद्यालयातर्फे सहभाग घेतला.त्यांनी तृणधान्याचा वापर करून सुलभ पाककृतीद्वारे भाकर,सत्तू,लाडू, फिंगर,बोर्नविटा ज्युस,पापड, हलवा,खीर इत्यादी पदार्थ बनविले. त्यात त्यांनी प्रथम क्रमांक प्राप्त केला. त्यांना बक्षीस व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. तसेच बक्षिसाचे पाच हजार रुपये त्यांच्या खात्यावर जमा होणार आहे.त्यांची जिल्हास्तरीय पाककृती स्पर्धेकरिता निवड झालेली आहे.त्या जिल्हास्तरावर सरस्वती विद्यालयाचे प्रतिनिधित्व करणार आहेत. त्यांच्या यशाबद्दल संस्थेतर्फे प्राचार्य जे.डी.पठाण, उपप्राचार्य महेश पालीवाल, पर्यवेक्षक लोकमित्र खोब्रागडे,शव्या जैन यांनी पारितोषिक, सन्मानचिन्ह व पुष्पगुच्छ देऊन त्यांचे अभिनंदन केले व जिल्हास्तराकरिता शुभेच्छा दिल्या. तसेच त्यांना मार्गदर्शन करणारे सहाय्यक शिक्षक कुंडलिक लोथे,होमराज गजबे, अमर वसाके, चेतना गोस्वामी यांचे सुद्धा सहकार्याबद्दल अभिनंदन करण्यात आले.