*तहसीलदार साहेबांच्या आशिर्वादाने रेतीच्या अवैध धंद्यांना चालना*
*पोलीस योध्दा न्युज*. विशेष वार्ता -पोलीस योध्दा न्यूज नेटवर्क ला मिळालेल्या माहितीनुसार वर्तमान तहसीलदार तुमसर यांनी अवैध रेती वाहतूकदारांना रेती रेती तस्करी करण्यासाठी उकसवुन रेती माफिया कडुन लाखो-करोडो रुपये साठा केलेला आहे अशी चर्चा नागरिकांकडून होत आहे.
काही दिवसांपूर्वी सुमारे सकाळी सकाळी आठ वाजे दरम्यान तहसीलदार तुमसर आले होते,नाकाडोंगरी नजीक कवलेवाडा फाट्याजवळ रेती भरलेले दोन ट्रॅक्टर पकडले, त्यांच्यावर गुन्हा दाखल करित होते, परंतु अशी गावकऱ्यांमध्ये चर्चा आहे कि एका ट्रॅंकर मालकाकडून पन्नास, पन्नास हजार वसुली करुन ट्रॅंकर सोडले,अशी चर्चा आहे.
बाबरे बाप एका दिवसाची कमाई एक घाटावरून एक लाख रुपये!
असे अकरा सोडलेल्या रेति घाटाची कमाई किती असेल?
ह्या मध्ये पुठारी सुध्दा सहयोगी आहेत असा *पोलीस योध्दा न्युज नेटवर्क* काही सुत्रांकडून समजते.
ह्या बाबिकडे महसुल मंत्रालय,विभागीय आयुक्त नागपूर, उपायुक्त महसुल नागपूर मिलिंद कुमार साळवे, जिल्हाधिकारी संदिप कदम साहेब, उपविभागीय अधिकारी सतगिर साहेब व ईथले लोकप्रतिनिधी यांनी लक्ष देण्याची गरज आहे व दोषीअधीकारी व अवैध धंदे मालक यांना सजा देऊन निलंबनाची कारवाई करावी.
*पोलीस योध्दा न्युज नेटवर्क* ला बातमी प्रकाशित होताच परिणाम काय निघते यांकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
*राजेश उके*
सहकारी संपादक
तथा विशेष पत्रकार
:-9765928259