तहसीलदार तुमसर व थानेदार गोबरवाही यांच्या मेहरबानी मुळे बावनथडी नदीची रेतीची अवैधरित्या तस्करी
*पोलीस योध्दा न्युज नेटवर्क विशेष वार्ता* -पोलीस योध्दा न्युज नेटवर्क ने घेतलेल्या माहितीनुसार बावनथडी नदीतुन अवैधरित्या रेती तस्करी रात्रंदिवस आताही सुरू आहे.
शोध घेण्याची आवश्यकता आहे कि ह्या अवैध उपशाला कोण मोठा पुठारी साथ देतोय?
राजेश उके, डेप्युटी डायरेक्टर, *पोलीस योध्दा न्युज नेटवर्क* यांनी चिखला माईन मॅंनेजर यांच्या सोबत मोबाईल वर चर्चा केली असता त्यांनी सांगितले की 30 सप्टेंबर2021पर्यत बंद आहे असे असले तरीही मग हे मोठ मोठे ट्रक पोलीस स्टेशन गोबरवाही ओलांडून कसे काय जातात हा विषय विचार करण्यासारखा आहे.
मग पोलीस स्टेशन मधील कर्मचारी काय करतात व महसुल विभागातील कर्मचारी काय करतात?
काही कालावधीनंतर भुगर्भातील संतुलन बिघडुन भुकंप येण्याची शक्यता नाकारता येणार नाही,याची संपूर्ण जवाबदारी सन2021चे शासन व प्रशासनाची राहिल.
राज्य स्थरीय व केन्द्रिय भौगोलिक वैध्यानिकाशने ह्याकडे लक्ष देण्याची गरज आहे.
नदीमधील रेतीचा उपसा होत असल्याने पाण्याची पातळी एकदम खोलवर गेलेली आहे.
बोर केल्यानंतर ही पाणी दोनसे अडीजसे अंतरावर पाणी लागतो हे फक्त रेती उपसा चे कारण आहेत.
जिल्हा प्रशासनाने रेती माफियांचे नाव घोषित करायला पाहिजे.
अशी चर्चा आहे कि रेती माफिया एका घाटाचे (तहसील व पोलीस स्टेशन) प्रत्येकी पन्नास-पन्नास हजार रुपये देतात व अशिहि चर्चा आहे कि जिल्हा प्रशासनाला सुध्दा काही हिस्सा देतात व त्यांची साखळी आहे असे वर्तवल्यात जात आहे.
मग पत्रकार कशाला तो तर लोकशाही चा चौथा स्तंभ आहे,त्याची काहीच जवाबदारी नाही काय? डोळ्यासमोरून ह्या चोऱ्या होतात.
रेती माफिया कडुन असे बोलण्यात येते की *हमारा कोई कुछ बिघाड नही सकता अधिकारी व हमारी सरकार है*
मग पत्रकारांनी उगीच कोपऱ्यात बसुन व आपली लेखणी बंद करुन कोपऱ्यात बसायला पाहिजे!असी परिस्थिती निर्माण झाली आहे.
फक्त रेती माफिया व अधीकारी मिळुनच देशाला चालवितील.
*पोलीस योध्दा न्युज नेटवर्क* हा अंक सर्व राजकीय पक्ष व अधीकाऱ्यांनी वाचुन निर्णय घेण्याची गरज आहे.
व संबंधित अधिकारी व रेती माफिया वर कार्यवाही व्हायला पाहिजे!
(*प्रकाशित अंक न्यूज सचीव व, महसुल मंत्रालय व सचीव गृह मंत्रालय ला वायरल हो.*)