BREAKING NEWS:
हेडलाइन

तळेगाव श्यामजी पंत येथे शिवसेना पदाधिकाऱ्यांचे शिव संपर्क अभियान व आढावा बैठक

Summary

तळेगाव श्यामजी पंत येथे शिवसेना पदाधिकाऱ्यांचे शिव संपर्क अभियान व आढावा बैठक शिवसेना नेते खासदार कृपाल तुमाने यांचे शिवसेना कार्यकर्त्यांना मार्गदर्शन   पोलीस योद्धा वृत्तसेवा   तळेगाव शामजी पंत येथे शिवसेनेचे नेते खासदार कृपाल तुमाने व अनंतराव गुढे वर्धा जिल्हा […]

तळेगाव श्यामजी पंत येथे शिवसेना पदाधिकाऱ्यांचे शिव संपर्क अभियान व आढावा बैठक

शिवसेना नेते खासदार कृपाल तुमाने यांचे शिवसेना कार्यकर्त्यांना मार्गदर्शन

 

पोलीस योद्धा वृत्तसेवा

 

तळेगाव शामजी पंत येथे शिवसेनेचे नेते खासदार कृपाल तुमाने व अनंतराव गुढे वर्धा जिल्हा संपर्क प्रमुख व प्रशांत शहागडकर जिल्हा प्रमुख पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार शिव संपर्क अभियानाअंतर्गत दिनांक 22 ते 25 मार्च पर्यंत संपूर्ण महाराष्ट्रामध्ये या अभियानाला सुरुवात झाली .

त्या अनुषंगाने वर्धा जिल्ह्यातील तळेगाव शामजी पंत या गावांमध्ये हॉटेल बॅट अँड बॉल मध्ये आर्वी , आष्टी , कारंजा या तीनही तालुक्यातील सर्व पदाधिकाऱ्यांची आढावा बैठक घेण्यात आली. येणाऱ्या जिल्हा परिषद , पंचायत समिती व नगरपरिषद आपल्याला निवडणुकीला सामोरे जायचे आहे. त्यासंदर्भात मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले . व प्रत्येक गावांमध्ये व विधानसभा क्षेत्रांमध्ये शाखा स्थापन करून शिवसैनिक तयार व्हावे तसेच शासकीय योजनेचा लाभ शेतकरी सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचविण्यासाठी प्रयत्न करावा असे मान्यवरांनी सांगितले .

यावेळी विकास परणकर कारंजा तालुका प्रमुख दशरथ जाधव वर्धा जिल्हा उप प्रमुख संजय टिपरे विनोद डोंगरे शिवसेना शहर प्रमुख सुनील घाटे शिवसेना उपशहरप्रमुख अण्णा सिंग व विधानसभेतील सर्व पदाधिकारी उपस्थित होते .

 

महेश देवशोध ( राठोड )

वर्धा , जिल्हा प्रतिनिधी

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *