तळेगावच्या सत्याग्रही घाटात अनोळखी इसमाचा मृतदेह आढळल्याने खळबळ

तळेगावच्या सत्याग्रही घाटात अनोळखी इसमाचा मृतदेह
आढळल्याने खळबळ
पोलीस योद्धा वृत्तसेवा
तळेगाव येथील सत्याग्रही घाटात नागपूर अमरावती राष्ट्रीय महामार्गालगत जैन मंदिराचे बाजूला एका अनोळखी इसमाचा मृतदेह आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे .
25 मार्च रोजी सकाळी अकरा वाजताच्या सुमारास ही घटना उघडकीस आली. काही नागरिकांना ही बाब निदर्शनास आली . त्यातील एका अनोळखी व्यक्तीने याची माहिती तळेगाव येथील एका पत्रकाराला दिली. त्या पत्रकारांनी मृत व्यक्ती बाबतची माहिती तळेगाव येथील ठाणेदारांना दिली . त्यावेळी स्थानिक पत्रकारांसह ठाणेदार आपल्या पोलिस कर्मचाऱ्यांसह घटनास्थळावर पोहोचले . तेव्हा झाडाखाली एक इसम अंदाजे वय 40 वर्ष तेथे मृतावस्थेत पडून होता. व त्याचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत होता. जवळपास दोन ते तीन दिवस आधी तो इसम मृत झाला असावा असा अंदाज आहे. नागरिकाकडून असा अंदाज नागरिकाकडून वर्तवला जात आहे . त्याच्या राहणीमानावरून तो वेडसर असावा असा सूर नागरिकांमधून येत होता. मृत व्यक्ती विषयी अधिक माहिती जर कोणास असेल तर त्यांनी पोलिसांना याची माहिती द्यावी. असे पोलिसांतर्फे सांगण्यात आले. घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह आर्वी येथील रुग्णालयात शवविच्छेदन करण्याकरिता पाठविण्यात आला. या घटनेचा पुढील तपास ठाणेदार आशिष गजभिये यांच्या मार्गदर्शनात पोलिस जमादार राजे शाहू , कैलास डांगे , सुरज राठोड विजय विखे, अमोल इंगोले हे करीत आहे.
▪महेश देवशोध ( राठोड )