ढोली-रो-ढोल-बाजे, बाजे रे ढोल उड़ी उडी जाये…. चे निनांदात कोंढाळीत गरबा महोत्सवाला सुरुवात माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सर्वांना शुभेच्छा
Summary
कोंढाळीत गरबा महोत्सवाला सुरुवात माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सर्वांना शुभेच्छा कोंढाळी – वार्ताहर धर्मोत्सव नगर कोंढाळीत नवरात्रीच्या आई जगदंबेच्या पूजेचा सण दरवर्षी मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो. येथे दुर्गा माता उत्सव समित्यांच्या मंडपांबरोबरच माता मंदिरांमध्ये विशेष पूजेसह मातेची महा […]

कोंढाळीत गरबा महोत्सवाला सुरुवात माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सर्वांना शुभेच्छा
कोंढाळी – वार्ताहर धर्मोत्सव नगर कोंढाळीत नवरात्रीच्या आई जगदंबेच्या पूजेचा सण दरवर्षी मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो. येथे दुर्गा माता उत्सव समित्यांच्या मंडपांबरोबरच माता मंदिरांमध्ये विशेष पूजेसह मातेची महा आरती केली जाते. त्याचबरोबर सायंकाळी नगरात ठिकठिकाणी गरब्याचे आयोजन करण्यात आले आहे. कोंढाळी नगरात होणारा प्रत्येक कार्यक्रम हा मोठ्या थाटामाटात पार पडत असतो. तरी या सर्वांमध्ये कोढाळी नागरीत समाजाच्या पारंपरिक गरबा उत्सवाला वेगळे स्थान आहे. जिथे उड़ी उड़ी जाय,व बाजे रे बाजे ढोल बाजे ऽऽऽऽच्या तालावर
दररोज यातिल स्पर्धक वेगवेगळ्या रंगाचे पोशाख परिधान करून या कार्यक्रमात सहभागी होतात. या गरबा महोत्सवाच्या आयोजनाचे मनोधैर्य उंचावण्यासाठी महाराष्ट्राचे माजी गृहराज्यमंत्री तथा आमदार अनिल देशमुख यांच्या हस्ते येथील देशमुख लेऊट येथे दुर्गा उत्सव समितीच्या वतीने आयोजित गरबा दांडिया महोत्सवाचे उद्घाटन तसेच राम नगर येथील पंचबुधे सभागृह चे प्रांगणात आयोजित दुर्गा उत्सव समितीच्या दांडिया महोत्सवाचे ही उद्घाटन माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी उद्घाटन केले. यावेळी दांडिया महोत्सवात सहभागी झालेल्या सर्व मुला-मुलींना तसेच आयोजन समितीच्या सर्व अध्यक्ष, सचिव व सदस्यांना शुभेच्छा देण्यात आल्या. धर्मत्सव नगर कोंढाळी येथील सर्व प्रभागात मंडप सजवून दुर्गा देवीचा नवरात्रोत्सव साजरा करण्यात येत आहे. नवरात्रीनिमित्त उमाठे नगर, रामनगर, विकास नगर, शिरमी, सायखोडे, गांधी लेआउट, शनिवार पेठ, बारी पुरा, राम मंदिर चौक, जैन मंदिर चौक, भोईपुरा यासह शेकडो घरांमध्ये मातेच्या घटस्थापनेसह धर्मोत्सव नगरी कोंढाळी.माताराणी चे चरणी लीन राहते. येथील गरबा उत्सव समिती व नवदुर्गा महोत्सवाचे सर्व आयोजक नवरात्री महाधर्मोत्सवाच्या आयोजनासाठी यशस्वी प्रयत्न करत आहेत. कोंढाळी पोलीस ठाण्याचे अधिकारी राजकुमार त्रिपाठी, उपनिरीक्षक धवल देशमुख, रोशन खांडेकर, भोजराज तांदुळकर व उपलब्ध पोलीस पथक तसेच होमगार्ड यांचे कडून चोख सुरक्षा व्यवस्था ठेवली जात आहे.