नागपुर महाराष्ट्र हेडलाइन

डोरली उप वनाच्या संरक्षित वनात केलेली अतिक्रमने काढली

Summary

कोंढाळी- प्रतिनिधी-दुर्गाप्रसाद पांडे कोंढाळी वनपरिक्षेत्रातील डोरली उप वनाच्या संरक्षित वन130चे सर्हे क्रमांक सात व 23 मधिल 0.54हेक्टर आर जमिनीवर शेतक-याने केलेली अतिक्रमन काढण्यात कोंढाळी वनविभागाला यश मिळल आहे. डोरली उपवन हद्दीतील सह्वे नबंर 07व23 मधील संरक्षित वनजमीनीत शेतकऱ्यांनी अतिक्रमण केले […]

कोंढाळी- प्रतिनिधी-दुर्गाप्रसाद पांडे

कोंढाळी वनपरिक्षेत्रातील डोरली उप वनाच्या संरक्षित वन130चे सर्हे क्रमांक सात व 23 मधिल 0.54हेक्टर आर जमिनीवर शेतक-याने केलेली अतिक्रमन काढण्यात कोंढाळी वनविभागाला यश मिळल आहे. डोरली उपवन हद्दीतील सह्वे नबंर 07व23 मधील संरक्षित वनजमीनीत शेतकऱ्यांनी अतिक्रमण केले होते.यामध्ये शेतक-याने गोठा,मुक्कासाठी घर, वनजमिनवर तारकुंपन करून खरिप व रब्बी ची पिके घेत होते.हि पिके काढून टाकत याठिकाणी बांधलेला गोठा व घर तसेच तार कुंपन काढून वनविभागाच्या जमिनीची हद्द निश्चित करण्याचा काटोल उपविभाग वन अधिकारी प्रज्योत पालवे यांनी अहवाल दिला. या अहवालानुसार नागपूर वन विभागाचे उप वन संरक्षक डॉ भारत सिंह हाडा यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय वन अधिकारी प्रज्योत पालवे यांच्या आदेशानुसार कोंढाळी वन परिक्षेत्र अधिकारी निशिकांत कापगते, डोरली उपवन अधिकारी एम डी वाघधरे, वन रक्षक राहूल हूलकाने,मधुकर तुमडाम, आरती मेश्राम, वन मजूर बाबा राव राऊत,किशोर कुसळकर,यांनी जे सी बी चे सहाय्याने संरक्षित वनातील अतिक्रमण निष्कासनाची कार्यवाही पार पाडली.वन अधिकारी निशिकांत कापगते यांनी शेतकऱ्यांना बोलावून वन जमिनीचे महत्त्व तसेच झाडाचे महत्त्व ,पर्यावरणाचे महत्त्व सांगुन मशीनच्या साह्याने अतिक्रमण काढुन घेण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *