महाराष्ट्र हेडलाइन

डोंबिवलीत दुकानदाराच्या पत्नीची हत्या

Summary

डोंबिवली : डोंबिवलीत रेशनिंग दुकानातच महिलेची हत्या झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. दुकानातील कामगारानेच महिलेची हत्या केल्याचा आरोप आहे. मयत महिला ही दुकानदाराची पत्नी होती. हत्येचं नेमकं कारण अद्याप अस्पष्ट आहे. लोढा हेवन परिसरात हत्याकांड डोंबिवलीतील लोढा हेवन परिसरात हा धक्कादायक प्रकार […]

डोंबिवली : डोंबिवलीत रेशनिंग दुकानातच महिलेची हत्या झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. दुकानातील कामगारानेच महिलेची हत्या केल्याचा आरोप आहे. मयत महिला ही दुकानदाराची पत्नी होती. हत्येचं नेमकं कारण अद्याप अस्पष्ट आहे.

लोढा हेवन परिसरात हत्याकांड

डोंबिवलीतील लोढा हेवन परिसरात हा धक्कादायक प्रकार घडला आहे. रेशनिंग दुकानदाराच्या पत्नीची दुकानातच हत्या करण्यात आली. श्वेता राजेश गुप्ता असं मयत महिलेचं नाव आहे.

दुकानातील कामगार ताब्यात

दुकानातील कामगारानेच श्वेता गुप्ता यांची हत्या केल्याची प्राथमिक माहिती आहे. संशयित आरोपीला मानपाडा पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. गुड्डू कुमार सिंग असं संशयित कामगाराचं नाव आहे. हत्येचं कारण अद्याप अस्पष्ट आहे.

जगदीश जावळे
ठाणे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *