महाराष्ट्र राजकीय हेडलाइन

डोंगरीभागातील गावात अतिवृष्टीमुळे नुकसान; तीन दिवसात प्रस्ताव करा – गृहराज्य मंत्री यांच्या तालुका प्रशासनाला सूचना

Summary

सातारा दि. 18 (जिमाका) : गेल्या दोन तीन दिवसांपासून सातारा जिल्ह्यातील डोंगरी भागातील गावांमध्ये अतिवृष्टी  झाली आहे. अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचे येत्या तीन दिवसांत पंचनामे करुन प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांमार्फत शासनास सादर करा, अशा सूचना गृह (ग्रामीण) राज्यमंत्री शुभूराज देसाई यांनी केल्या. पाटण […]

सातारा दि. 18 (जिमाका) : गेल्या दोन तीन दिवसांपासून सातारा जिल्ह्यातील डोंगरी भागातील गावांमध्ये अतिवृष्टी  झाली आहे. अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचे येत्या तीन दिवसांत पंचनामे करुन प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांमार्फत शासनास सादर करा, अशा सूचना गृह (ग्रामीण) राज्यमंत्री शुभूराज देसाई यांनी केल्या.

पाटण तालुक्यातील अतीवृष्टीमुळे बाधित झालेल्या विविध गावांची पाहणी गृह राज्यमंत्री श्री .देसाई यांनी केली. यावेळी त्यांनी सूचना केल्या. या पाहणी प्रसंगी पाटणचे प्रांताधिकारी श्रीरंग तांबे, तहसिलदार योगेश्वर टोणपे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दशरथ काळे यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

गेल्या दोन-तीन दिवसांपासून झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतजमिनीचे, रस्ते, पूल व शेतीचे नुकसान झाले आहे. काही शेतकऱ्यांसमोर दुबार पेरणीचे संकट उभे राहिले आहे. त्याचे पंचनामे कृषी विभाग, महसुल विभाग व ग्रामसेवक यांनी तात्काळ पंचनामे करुन एकत्रित प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांमार्फत शासनास सादर करावा.  प्रस्ताव मंत्रीमंडळाच्या बैठकीत शासनाच्या निदर्शनास आणला जाईल. झालेल्या नुकसानाची भरपाई मिळण्यासाठी  व अतिवृष्टीमुळे विस्कळीत झालेली दळणवळण व्यवस्था पूर्ववत करणार असल्याचेही प्रयत्न श्री.शंभूराज देसाई यांनी पाहणी दरम्यान सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *