डॉ. बाबासाहेब आंबेडकर साहित्यिक विचारमंच. – राज्यस्तरीय ऑनलाईन कवी संमेलनाचे आयोजन .

गडचिरोली विभागीय प्रतिनिधी चक्रधर मेश्राम दि. 17 मे. 2021 :-
डॉ. बाबासाहेब आंबेडकर साहित्यिक विचार मंच जिल्हा शाखा गडचिरोली द्वारा ” 26 मे बुद्ध जयंती ” निमित्ताने तथागत भगवान गौतम बुद्ध आणि डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे मानवतावादी विचार आणि तत्वज्ञान सर्व सामान्यांपर्यंत पोहोचावे म्हणून दिनांक 22 व 23 मे शनिवार व रविवारला राज्यस्तरीय ऑनलाईन कवि संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. ” *तथागत भगवान गौतम बुद्ध* *जीवन व तत्त्वज्ञान* ” या विषयावर एक कविता सादर करायची आहे . या कवी संमेलनात सर्व वयोगटातील कवीना भाग घेता येईल . यात फक्त चाळीस कवी समाविष्ठ राहतील .. जे आधी नोंदणी करतील त्यांना प्रथम प्राधान्य राहील . सर्व सहभागी कवींना रंगीन व आकर्षक प्रमाणपत्र जिल्हा शाखेकडून दिले जाईल . सायंकाळी 5 ते 7 या वेळात कविसंमेलन होईल .
इच्छुक कवींनी आपल्या नावाची नोंद जिल्हा शाखेचे अध्यक्ष सोपानदेव म्हशाखेत्री (7588772745 ) , सचिव प्रा. गौतम डांगे ( 9422 361077 ) , कार्याध्यक्ष संगीता पाटील (9423604140) यांचेकडे दिनांक 18 मे सायंकाळ पर्यंत करावी . त्यानंतर आलेली नावे स्वीकारली जाणार नाही याची नोंद घ्यावी .प्रा गौतम डांगे यांनी दिली.