डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्युत कर्मचारी सहकारी पतसंस्था मर्यादित, उर्जानगर, चंद्रपूर. रजि. क्र. सी एच डी /आर एस आर ११३ / १९९४ त्रिदशक समारोह २०२४ संपन्न

३० व्या वर्धापन दिना निमित्त दिनांक २९ नोव्हेंबर २०२४ रोजी देबू सावली वृद्धाश्रम, देवाळा, नवीन चंद्रपूर येथे सर्व संचालक मंडळ व प्रमुख अतिथी माननीय सुमेध पथाडे साहेब यांनी भेट देऊन वृद्ध महिलांना साडी, पुरुषांना शाल व इतर साहित्य भेट देण्यात आले त्यावेळी सर्व वृद्धाश्रमातील वृद्ध खूपच आनंदी झाले. दिनांक ३० नोव्हेंबर २०२४ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्युत कर्मचारी सहकारी पतसंस्था मर्यादित येथे समारोह-२०२४ आयोजित करण्यात आला त्रिदर्शक समारोहचे अध्यक्ष स्थान माननीय प्रदीप मेश्राम साहेब यांनी भूषविले तसेच उद्घाटक माननीय अशोक उमरे साहेब उपमुख्य अभियंता (प्रभारी) यांनी नूतनीकरण केलेल्या कार्यालयाचे उद्घाटन करून मार्गदर्शन केले, प्रमुख पाहुणे माननीय के. के. मेश्राम साहेब, अधीक्षक अभियंता, माननीय दिलीप वंजारी साहेब, कल्याण अधिकारी यांनी मार्गदर्शन केले. व प्रशिक्षक माननीय एस. व्ही. मोरे साहेब, माननीय अँडव्होकेट प्रशांत शिर्के साहेब, प्रशिक्षक यांनी संचालक मंडळाला सहकार प्रशिक्षण दिले, त्रिदशक समारोहाचे सूत्रसंचालन सौ. शितल मेश्राम मॅडम, संचालक यांनी केले, भारतीय संविधान प्रास्ताविकेचे वाचन माननीय भिमराव उंदीरवाडे, कोषाध्यक्ष यांनी केले तसेच माजी संचालक यांचे सत्कार कार्यक्रमाचे सूत्रसंचालन माननीय गौतम रामटेके, संचालक यांनी केले, माजी अध्यक्ष माननीय सी. जी. रामटेके साहेब, माननीय एन. डी. डांगे साहेब, यांनी मार्गदर्शन केले व अध्यक्षीय भाषण माननीय प्रदीप मेश्राम साहेब, अध्यक्ष यांनी केले व आभार प्रदर्शन माननीय रुपेश उमरे साहेब, उपाध्यक्ष यांनी केले, सदर त्रिदशक कार्यक्रम यशस्वी होण्याकरिता विशेष परिश्रम माननीय प्रदीप मेश्राम साहेब, अध्यक्ष, रुपेश उमरे साहेब उपाध्यक्ष, माननीय विकास गेडाम साहेब, मानद सचिव, माननीय शंकर दरेकर साहेब सहसचिव, माननीय भिमराव उंदीरवाडे कोषाध्यक्ष तसेच सर्व संचालक माननीय गौतम जे. रामटेके, माननीय सचिन आर. गायकवाड, आर. एस. रोकमवार, हरिदास बी. बोरकर , सरोजिनी लोखंडे, शीतल मेश्राम व कार्यालयीन कर्मचारी मनोद रायपूरे , विजय डोखोरे, नितीन साव यांनी परिश्रम घेतले.