डॉ. बाबासाहेब आंबेडकर रुग्णालय आणि अनुसंधान केंद्राच्या विस्तारीकरणाचे काम लवकरच – वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन
Summary
मुंबई, दि. 3 : नागपूर येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर रुग्णालय आणि अनुसंधान केंद्र विस्तारीकरणाच्या प्रकल्पास निधी मंजूर झालेला आहे. या दोन्ही प्रकल्पासाठी आवश्यक असणाऱ्या जागेसंदर्भातील प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याने याबाबत लवकरच बैठक घेऊन निर्णय घेण्यात येईल, असे वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन यांनी विधानसभेत सांगितले. […]
मुंबई, दि. 3 : नागपूर येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर रुग्णालय आणि अनुसंधान केंद्र विस्तारीकरणाच्या प्रकल्पास निधी मंजूर झालेला आहे. या दोन्ही प्रकल्पासाठी आवश्यक असणाऱ्या जागेसंदर्भातील प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याने याबाबत लवकरच बैठक घेऊन निर्णय घेण्यात येईल, असे वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन यांनी विधानसभेत सांगितले.
उत्तर नागपूर येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर रुग्णालय आणि अनुसंधान केंद्राच्या विस्तारीकरणाच्या प्रकल्पाबाबतचा प्रश्न विरोधी पक्षनेते अजित पवार, विधानसभा सदस्य सर्वश्री विकास ठाकरे, नितीन राऊत यांनी उपस्थित केला होता.
मंत्री श्री. महाजन म्हणाले, हा प्रकल्प पूर्ण करण्याकरिता आवश्यक असलेल्या जागेपैकी १५०० चौ.मी. जागेवर न्यू ग्रँट एज्युकेशन संस्थेची इमारत असून या संस्थेच्या जागेचे प्रकरण न्यायप्रविष्ठ आहे. या प्रकल्पासाठी आवश्यक जागेसंदर्भात स्थानिक लोकप्रतिनिधींसमवेत प्रत्यक्ष पाहणी करून बैठक घेण्यात येईल.
000