डॉ प्राची बुटे रिसर्च पेपर परीक्षेत राज्यात दुसरी
काटोल/कोंढाळी-दुर्गाप्रसाद पांडे -प्रतिनिधी-
राज्यात पार पडलेल्या जनरल ऑफ सान्सटिफिक प्रोग्रेस अँड रिसर्च पेपर प्रमाणपत्र परीक्षेचा निकाल मंगळवारला जाहीर होऊन डॉ प्राची वंदना सुधीर बुटे रा. कोंढाळी जि नागपूर हिने राज्यात दुसरे स्थान पटकाविले आहे. तिला ₹ 20,000/- रोख पारितोषिक व प्रमाणपत्र प्राप्त झाले आहे. प्राची सद्या शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालय अमरावती येथे मास्टर ऑफ डॉक्टरेट (MD)करीत आहे. तिचे पाल्य ला भु वि व कनिष्ठ महाविद्यालय कोंढाळी येथे प्राचार्य पदावर तर आई वंदना शिक्षिका म्हणून कार्यरत आहे. धाकटा भाऊ सृजन एमबीबीएस चवथे वर्षाला आहे.डॉ प्राची बुटे हिने राज्यस्तरीय स्पर्धेत मिळाविलेल्या सुयशाबद्दल तिचे कौतुक होत आहे.