डॉ. प्रकाश आमटे कोरोना पॉसिटीव्ह : हेमलकसा येथील लोक बिरादरी प्रकल्प, आनंदवन आणि सोमनाथ प्रकल्प पर्यटकांसाठी पुढील काही महिने बंद राहण्याची शक्यता
बाबांना(डॉ.प्रकाश आमटे) गेले 7 दिवस ताप खोकला होता. परवा कोरोना टेस्ट केली. RTPCR negative आली. ताप खोकला औषध घेऊन सुद्धा कमी होत नव्हता. म्हणून आज चंद्रपूर ला चेक अप केला. डॉ.दिगंत आणि आई सोबत होते. सीटी स्कॅन आणि इतर ब्लड टेस्ट चेक अप मध्ये कोरोना positive असल्याचे स्पष्ट झाले.
तज्ञ डॉक्टरांनी नागपुरात admit व्हायचा सल्ला दिला आहे. आज admit करणार आहे. Mahorkar Hospital, Dhantoli. गेल्या काही दिवसात संपर्कात आलेल्या सर्वांनी काळजी घ्यावी. कोरोना परत आपल्या राज्यात वाढतोय.
म्हणून हेमलकसा येथील लोक बिरादरी प्रकल्प, आनंदवन आणि सोमनाथ प्रकल्प पर्यटकांसाठी पुढील काही महिने बंद करावे लागत आहेत. कृपया सर्वांनी नोंद घ्यावी. स्वतःची व इतरांची कोरोना संदर्भातील नियम पाळून काळजी घ्यावी.असे अनिकेत प्रकाश आमटे यांनी सोशल माध्यमावर कळविले आहे.
विक्की नगराळे
तालुका व चंद्रपुर
शहर प्रतिनिधी
चंद्रपुर