महाराष्ट्र हेडलाइन

डॉ. पंजाबराव देशमुख राष्ट्रीय शिक्षक परिषदेच्या जागतिक महिला दिनी दिले जाणारे हिरकणी पुरस्कार घोषित

Summary

नागपूर– डॉ. पंजाबराव देशमुख राष्ट्रीय शिक्षक परिषदेच्या वतीने शैक्षणिक, सामाजिक, व्यावसायिक इत्यादी क्षेत्रात भरीव योगदान देणाऱ्या स्त्री शक्तीचा जागतिक महिला दिनी हिरकणी राज्यस्तरीय पुरस्कार देवून सन्मान केला जाणार आहे. या वर्षीच्या राज्यस्तरीय हिरकणी पुरस्कारांची घोषणा आज डॉ. पंजाबराव देशमुख राष्ट्रीय […]

नागपूर– डॉ. पंजाबराव देशमुख राष्ट्रीय शिक्षक परिषदेच्या वतीने शैक्षणिक, सामाजिक, व्यावसायिक इत्यादी क्षेत्रात भरीव योगदान देणाऱ्या स्त्री शक्तीचा जागतिक महिला दिनी हिरकणी राज्यस्तरीय पुरस्कार देवून सन्मान केला जाणार आहे. या वर्षीच्या राज्यस्तरीय हिरकणी पुरस्कारांची घोषणा आज डॉ. पंजाबराव देशमुख राष्ट्रीय शिक्षक परिषदेचे संस्थापक अध्यक्ष पप्पू पाटील भोयर, प्रदेशाध्यक्ष प्रदीप सोळंके, प्रदेशाध्यक्ष (प्रा.) लक्ष्मण नेव्हल यांनी संयुक्त रित्या जाहीर केलेल्या प्रसिद्धी पत्रकातून करण्यात आली आहे. या वर्षीचे डॉ. पंजाबराव देशमुख राष्ट्रीय शिक्षक परिषदेचे राज्यस्तरीय हिरकणी पुरस्कार – डॉ. भारती मंडवई ( नांदेड ), डॉ. शारदा रोशनखेडे ( नागपूर ), मीनाताई हिरालाल भोसले    ( धुळे ),  डॉ. अभिलाषा राकेश गावतूरे ( चंद्रपूर ), प्रफुल्लता बळीराम भिंगोले ( जालना ), मनीषा राकेश पाटील ( जळगाव ),   प्रतीभाताई भराडे (सातारा), डॉ. सुचिता पाटेकर   ( परभणी ), कल्पना हरिभाऊ कातोरे ( परभणी ), प्राचार्य मिनी थॉमस ( यवतमाळ ).                                                                 यांना जाहीर झाले असून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सदरील पुरस्कारांचे वितरण पुरस्कार विजेत्यांच्या घरी जावून करण्यात येणार आहे. तसेच संघटनेच्या वतीने दि. ८ मार्च २०२१ रोजी सायंकाळी ठीक ७ वा. डॉ. पंजाबराव देशमुख राष्ट्रीय शिक्षक परिषदेच्या अधिकृत फेसबुक पेज वरून फेसबुक लाईव्ह द्वारे सुप्रसिद्ध वक्त्या डॉ. भारती मंडवई ( नांदेड ) यांचे महिलांचे शारीरिक – मानसिक आरोग्य आणि सबलीकरण या विषयावर ऑनलाईन व्याख्यान देखील आयोजित करण्यात आले आहे.सर्व पुरस्कारार्थीचे डाँ. पंजाबराव देशमुख राष्ट्रीय शिक्षक परिषदचे राष्ट्रीय अध्यक्ष पप्पू पाटील भोयर, प्रदीप सोळंके, प्रदेशाध्यक्ष लक्ष्मण नेव्हल ,महासचिव सुनिल चव्हाण, कार्याध्यक्ष दयानंद जाधव, कोषाध्यक्ष प्रभाकर पराड, शांताराम जळते, सतिष काळे, प्रा.शेषराव येलेकर, डाँ.विलास पाटील,नागपूर विभागीय अध्यक्ष संजय निंबाळकर राजकिरण चव्हाण, विनोद आगलावे, शामराव लवांडे, वसंत नेरकर, राजेंद्र भोयर, शालिक बोरसे, बंडू डाखरे, प्रल्हाद कर्हाळे, देवेंद्र टाले, ज्ञानेश्वर गायकवाड ,प्रेमचंद आहिरराव, आर.आर.वांडेकर, के.डी.वाघ, विठ्ठल घायाळ, अनंत मिटकरी, भास्कर शिंदे, पंजाब दांदले,  संजय निंबाळकर, हर्षा वाघमारे, कीर्ती कालमेेघ चेतना कांबळे,गजानन कोगरे प्रवीण मेश्राम, मेघराज गवखरे, सूरज बमनोटे,अतुल बोबडे,लोकोत्तम लोकोत्तम बुटले संगीता ठाकरे,स्वप्नील ठाकरे, पुप्पा कोंडलवार, प्रिया इंगळे,संजीव शिंदे,चेतन चव्हाण, समीर शेख,पक्षभान ढोक,योगेध कडू,राजू मालापुरे, विजय कांबळे,नंदा वाळके, गुणवत्ता देवाडे,विनोद चिकटे, गौरव शिंदे,प्रमोद कडुकर,नंदलाल यादव, संगिता निंबाळकर, यांनी अभिनंदन केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *