कृषि महाराष्ट्र हेडलाइन

डॉ. पंजाबराव कृषि विद्यापीठाचे विकसित तंत्रज्ञान प्रत्येक शेतकऱ्यांपर्यंत पोहचले पाहिजे शेतकरी वाचला तरच देश वाचेल!

Summary

डॉ पंजाबराव कृषि विद्यापीठाचे विकसित तंत्रज्ञान प्रत्येक शेतकऱ्यांपर्यंत पोहचले पाहिजे शेतकरी वाचला तरच देश वाचेल! शेतकऱ्यांचे आत्महत्या थांबविण्यासाठी कृषी वैज्ञानिक सहयोग करावा  डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला येथे एड. निलेश हेलोंडे पाटील यांचे प्रतिपादन –   कृषि संशोधन गावोगावी […]

डॉ पंजाबराव कृषि विद्यापीठाचे विकसित तंत्रज्ञान प्रत्येक शेतकऱ्यांपर्यंत पोहचले पाहिजे

शेतकरी वाचला तरच देश वाचेल!

शेतकऱ्यांचे आत्महत्या थांबविण्यासाठी कृषी वैज्ञानिक सहयोग करावा

 डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला येथे एड. निलेश हेलोंडे पाटील यांचे प्रतिपादन –

 

कृषि संशोधन गावोगावी पोहोचविण्याची गरज अधोरेखित • शेतकऱ्यांसाठी नवे तंत्रज्ञान, बियाणे व पूरक व्यवसायांचा खजिना

अकोला –

“कृषी हा भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा असून शेतकऱ्याला वाचवणे म्हणजेच देशाला वाचवणे होय,”  शेतकरी व शेती समृद्ध करायची असेल तर कृषी वैज्ञानिकांचे संशोधित संशोधनाची माहिती गावोगावचे शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी कृषी विभाग,जन प्रतिनिधी, कृषी मंडळांनीही प्रयत्न करावे असे प्रतिपादन कै. वसंतराव नाईक संस्था चे अध्यक्ष तथा राज्य मंत्री दर्जाचे एड. निलेश हेलोंडे पाटील यांनी केले. ते ५ सप्टेंबर रोजी डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला येथे झालेल्या मार्गदर्शन बैठकीत बोलत होते.

 

या वेळी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. शरद गडाख, विविध विभागांचे संचालक, अधिष्ठाता, कृषी वैज्ञानिक, संशोधक, कुलसचिव तसेच प्रगतिशील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

शेतकऱ्यांच्या आत्महत्यांना अटकाव करण्यासाठी विज्ञानाधारित शेती गरजेची

वसंतराव नाईक स्वावलंबन मिशन अध्यक्ष एड. निलेश हेलोंड पाटील

“चिकित्सक वृत्ती, अविरत प्रयत्न, विज्ञान व तंत्रज्ञान, सूक्ष्म परीक्षण, प्रशिक्षण आणि संशोधन या माध्यमातून कृषीचा मार्ग अधिक उज्वल होऊ शकतो. कमी खर्चाचे आणि अधिक उत्पादन देणारे शाश्वत तंत्रज्ञान गावोगावी शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत पोहोचले पाहिजे. त्याद्वारे शेतकरी आत्महत्या थांबविण्यास निश्चितच मदत होईल.”

 

त्यांनी पुढे सांगितले की, शेतकऱ्यांशी सुसंवाद आणि समन्वय साधून विद्यापीठ व शासनाच्या विविध योजनांचा प्रसार करणे अत्यावश्यक आहे. महिलांना आर्थिक उत्पन्न, तरुणांना रोजगार, गोपालकांना व्यवसायिक संधी व शेतकऱ्यांना उत्पादनवाढ यासाठी विद्यापीठाचे उपक्रम खूप महत्त्वाचे आहेत.

कुलगुरूंचे प्रतिपादन

कुलगुरू डॉ. शरद गडाख यांनी सांगितले –

“पी.के.व्ही. अकोला येथे नवनवीन संशोधनाधारित वाण विकसित होत आहेत. या वाणांचा लाभ शेतकऱ्यांनी घेतल्यास शाश्वत शेतीचा मार्ग खुला होईल. परंतु संशोधन गावोगावी पोहोचविण्यासाठी शासन, प्रशासन आणि शेतकरी या तिन्ही घटकांनी एकत्रितपणे प्रयत्न करणे आवश्यक आहे.”.       कृषी शास्त्रज्ञांची रिक्त पदांची पदपुर्ती करावी.    शेती व शेतकरी समृद्ध साठी कृषी वैज्ञानिकांच्या कृषी संशोधनाची फारच गरज आहे. मात्र कृषी विकासासाठी प्रख्यात डॉ पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठात कृषी वैज्ञानिकांचे बरेच  (६५%)पद रिक्त आहेत. यामुळे सध्या स्थितीत आपल्या कामगिरीवर असल्याने वैज्ञानिकांवर बर्याच प्रमाणात कामाचा ताण वाढत आहे. राज्य सरकारने याकडे लक्ष द्यावे व  या करिता वसंतराव नाईक स्वावलंबन मिशन चे अध्यक्ष (राज मंत्री दर्जा) एड निलेश हेलोंडे पाटील यांनी या प्रकरणी शासनदरबारी पाठपुरावा करावा असे आवाहन ही कुलगुरू डॉ शरद गडाख यांनी या प्रसंगी केले.

    संशोधनाची ठळक वैशिष्ट्ये व शिफारसी

 

१. बियाणे तंत्रज्ञान संशोधन विभागाच्या शिफारसी

उच्च उत्पादनक्षम वाण विकसित करून शेतकऱ्यांना उपलब्ध करून देणे.

 

बियाणे उत्पादन करताना योग्य अंतर, पेरणीची पद्धत, स्वच्छता व प्रमाणित तंत्रज्ञान वापरणे.

 

बियाणे मानके व गुणवत्तेची काटेकोर अंमलबजावणी.

२. माती परीक्षण व अन्नद्रव्य व्यवस्थापन

माती परीक्षणाद्वारे पिकांना आवश्यक असलेली अन्नद्रव्ये ओळखणे.

 

नत्र, स्फुरद, पालाश यांची संतुलित मात्रा पिकांना देणे.

 

कमतरतेमुळे पानांचा रंग बदलणे, वाढ खुंटणे, फुलगळ होणे यांसारखी लक्षणे आढळतात. यावर वेळेत उपाय करणे महत्त्वाचे.

३. सेंद्रिय व नैसर्गिक शेती व्यवस्थापन

गांडूळ खत, ढेंचा, बोरू यांचा वापर करून जमिनीची सुपीकता वाढवणे.

 

सेंद्रिय कपाशी लागवड तंत्रज्ञानाचा अवलंब.

 

नैसर्गिक शेतीसाठी दशपर्णी अर्क, जीवामृत, घनजीवामृत यांसारख्या निविष्ठांचा वापर.

४. भाजीपाला पिके

 मिरची, कांदा, भेंडी, वांगी, टोमॅटो, फुलकोबी, पानकोबी, लसूण, टरबुज, खरबुज, हळद, आले यांचे वैज्ञानिक लागवड तंत्र.

 

ओवा, सोप, कोथिंबीर, जिरे यांसारखी मसाला पिके विदर्भात फायदेशीर.

 

महिनावारी भाजीपाला लागवडीचे वेळापत्रक तयार करून शेतकऱ्यांनी त्यानुसार काम करावे.

 

रोग व किड व्यवस्थापनासाठी जैविक कीटकनाशके वापरण्यावर भर.

५. फळझाडे व बागायती पिके

पेरू, आंबा, डाळिंब, पपई यांसारख्या कोरडवाहू फळझाडांची लागवड तंत्र.

फळझाडांसाठी संतुलित खत व्यवस्थापन.

किडी व रोगांवर एकात्मिक व्यवस्थापन (IPM) तंत्राचा अवलंब.

६. फुलशेती

गुलाब, शेवंती, झेंडू, अॅस्टर, निशिगंध, मोगरा, ग्लॅडिओलस यांची लागवड तंत्र.

हरितगृह व शेडनेट तंत्रज्ञानाद्वारे निर्यातक्षम फुलशेतीचा प्रसार.

 

आधुनिक हायड्रोपोनिक्स तंत्रज्ञान वापरून मर्यादित जमिनीत मोठ्या प्रमाणावर उत्पादन.

७. औषधी व सुगंधी वनस्पती

लेमनग्रास, पुदिना, तुळस, अश्वगंधा यांसारख्या वनस्पतींमधून औषधी व सुगंधी तेल उत्पादन.

 

आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत मोठी मागणी असल्याने शेतकऱ्यांसाठी पूरक उत्पन्नाचा स्त्रोत.

८. कृषि अभियांत्रिकी व जल व्यवस्थापन

मृद व जलसंधारण पद्धती – कंटूर बंधारे, गाळपात्रे, बंधारे.

ठिबक व तुषार सिंचनाद्वारे पाण्याची बचत.

पीडीकेव्हीने विकसित केलेले सौर लाईट इन्सेक्ट ट्रॅप शेतकऱ्यांना मोठा फायदा देत आहे.

सौर ऊर्जा, जैववायू व बायोगॅसचा वापर करून शेतकऱ्यांचा खर्च कमी करणे.

९. पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय

गाई व म्हशींच्या सुधारित जाती व त्यांचे फायदे.

चारा पिके व मुरघास तंत्रज्ञानाद्वारे जनावरांचे पोषण.

कृत्रिम रेतन तंत्रज्ञानामुळे उत्पादनक्षम जनावरांची वाढ.

औषधी वनस्पतींचा वापर करून जनावरांचे आरोग्य सुधार.

१०. कृषिपुरक व्यवसाय

अळिंबी शेती, मत्स्यपालन, कुक्कुटपालन, ससेपालन यांसारखे व्यवसाय ग्रामीण तरुणांना रोजगार देऊ शकतात.

तुती लागवडीसह रेशीम शेती उद्योग ग्रामीण भागात उत्पन्नाचे नवे दालन उघडतो.

११. शेतीचे अर्थशास्त्र

शेतकऱ्यांनी ताळेबंद ठेवणे, खर्चाचे नियोजन करणे व बाजारपेठेचा अभ्यास करणे आवश्यक.

विद्यापीठाने दिलेल्या प्रशिक्षणानुसार शेतकऱ्यांनी आर्थिक साक्षरतेवर भर दिला पाहिजे.

*विदर्भातील सांख्यिकी माहिती*

महाराष्ट्राच्या कृषी क्षेत्रात विदर्भाचे योगदान महत्त्वाचे.

जमीन वापर, ओलीत क्षेत्र, सरासरी जमिनीचे आकारमान या बाबतीत आव्हाने.

जिल्हानिहाय पशुधन, हवामान, मातीचे प्रकार वेगवेगळे असल्याने संशोधनाधारित उपाययोजना गरजेच्या.         स्वंय रोजगारासाठी कृषि विद्यापीठाचे तंत्रज्ञान -कृ.उ.बा.समित्यांनी पुढाकार घ्यावा

 *विदर्भातील कृषी उत्पन्न बाजार समित्यांनी  आप आप आपल्या भागातील युवा शेतकरी व  बेरोजगार युवकांना रोजगार उपलब्ध करून रोजगारक्षम बनविण्यासाठी डॉ पंजाबराव देशमुख कृषी महाविद्यालय विद्यापीठाकडून  विकसित केलेले तंत्रज्ञानाचा उपयोग करून घेतला जाऊ शकतो. यात कचरा शुष्कक,प कृ वि मिनी दाल मिल संयत्र,मिरची बीज निष्कासन यंत्र,बाष्पकीय शीतक साठवन गृह,संत्रा, फळभाज्या साठवण,सीताफळ गरापासून बीज वेगळे करण्याचे यंत्र,गव्हांकूर भुकटी यंत्र,पशु खाद्य निर्मिती यंत्र,फळ प्रतवारी यंत्र, तात्पुरते धान्य झाकणे आवरण, सोयाबीन मधिल कचरा,खडे निष्कारण यंत्र,तूर चांगली भरडण विकारांची पूर्व प्रक्रिया, हिरव्या शेंगा सोलणी यंत्र,हिरवा हरबरा गाठे तोंडणी यंत्र,या प्रकारे एकूण३६प्रकार पकृवि अकोला चे वतिने विकसित केले आहे याचा लाभ शेतकऱ्यांना मिळावा या करिता राज्य सरकार चे पणन मंत्रालयाने विदर्भातील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मार्फत शेतकर्यांना याबाबत जनजागृती व संयंत्राचे उपयोग कसे करावे या करीता शेतकर्यांना प कृ वि अकोला येथे भेटी देण्यासाठी शिवार फेरी घेऊन संयंत्र उपलब्ध करून देण्यात यावी. अशी सुचना वसंतराव नाईक स्वावलंबन मिशन अध्यक्ष एड निलेश हेलोंडे पाटील यांनी केली आहे. 

 

या मार्गदर्शन बैठकीत  उपस्थित शेतकऱ्यांनी ही वरिल माहिती शेतकऱ्यांना मिळाली तर

शेतकऱ्यांच्या अडचणी, आत्महत्यांची समस्या आणि उत्पादनवाढ यावर एकमेव उपाय म्हणजे कृषी संशोधन गावोगावी पोहोचविणे आणि शेतकऱ्यांनी ते अंगीकारणे असे होईल. या करिता विषेत: कृ.उ.बा.समित्यांचे पदाधिकारी यांनी लक्ष दिलं पाहिजे असे  उपस्थित शेतकऱ्यांनी ही आपले मत मांडले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *