डॉ. नरेंद्र दाभोलकर व कॉम्रेड गोविंद पानसरेंच्या हत्या प्रकरणाच्या तपासावर उच्च न्यायालयाची नाराजी
सहा वर्षे झाली तरी अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येला आठ, तर कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या हत्या प्रकरणांचा तपास अद्याप पूर्ण झालेला नसल्याबाबत उच्च न्यायालयाने शुक्रवारी नाराजी व्यक्त केली.
*सीबीआय आणि एसआयटीला प्रश्न*
दाभोलकर आणि पानसरे यांची हत्या होऊन एवढा काळ लोटला तरी तपास पूर्ण न होणे हे योग्य नाही. आणखी किती काळ या प्रकरणांचा तपास सुरू राहणार, कुठेतरी हे थांबायला हवे असे उच्च न्यायालयाने सीबीआय आणि एसआयटी ला सुनावले.
*उच्च न्यायालयाचा तपास यंत्रणांना इशारा* : आम्ही तपास यंत्रणांच्या कामाविषयी शंका घेत नाही. परंतु प्रामाणिकपणे प्रयत्न सुरू असल्याचे दिसणेही आवश्यक आहे, असे सुनावताना जबाबदार अधिकाऱ्यांपैकी कोणाचीही गय केली जाणार नसल्याचा इशाराही न्यायालयाने दोन्ही तपास यंत्रणांना दिला.
📆 दरम्यान, या प्रकरणी शेवटची सुनावणी १३ फेब्रुवारी २०२० रोजी झाली होती.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लागू झालेल्या टाळेबंदीमुळे याचिकेवर सुनावणी होऊ शकली नव्हती.
त्यामुळे दोन्ही कुटुंबीयांनी याचिकेवर तातडीने सुनावणी घेण्याची मागणी केली होती.
त्यानुसार न्यायमूर्ती एस. एस. शिंदे आणि न्यायमूर्ती मनीष पितळे यांच्या खंडपीठासमोर शुक्रवारी या याचिकेवर सुनावणी झाली.
साजन रमेश कांबळे
दक्षिण मुंबई प्रतिनिधी
816904805