क्रीड़ा नागपुर महाराष्ट्र हेडलाइन

डॉजबॉल दिनानिमित्त राष्ट्रीय खेळाडूंनचा सत्कार लाखोटीया भुतडा वि व कनिष्ठ महा.विशेष आयोजन

Summary

कोंढाळी – वार्ताहर -दुर्गाप्रसाद पांडे स्थानिक लाखोटीया भुतडा विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय कोंढाळी जि नागपूर येथे डॉजबॉल दिनानिमित्त सत्र 2022-23 मध्ये शासनाचे आयोजित शालेय क्रीडा स्पर्धेत राष्ट्रीय व राज्यस्तर स्पर्धेत उत्कृष्ठ कामगिरी व सहभाग घेणाऱ्या 45 खेळाडूंचा सत्कार कार्यक्रम शनिवार […]

कोंढाळी – वार्ताहर -दुर्गाप्रसाद पांडे
स्थानिक लाखोटीया भुतडा विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय कोंढाळी जि नागपूर येथे डॉजबॉल दिनानिमित्त सत्र 2022-23 मध्ये शासनाचे आयोजित शालेय क्रीडा स्पर्धेत राष्ट्रीय व राज्यस्तर स्पर्धेत उत्कृष्ठ कामगिरी व सहभाग घेणाऱ्या 45 खेळाडूंचा सत्कार कार्यक्रम शनिवार दि 5 आगस्टला ई-लर्निंग हॉल मध्ये पार पडला. यावेळी दिल्ली शालेय राष्ट्रीय हँडबॉल स्पर्धा, शालेय डॉजबॉल स्पर्धेत महाराष्ट्र अजिंक्य पद पटकविणारा मुलींचा संघ, शालेय स्पर्धेत राज्यात उपविजेता ठरलेला हँडबॉल संघ,व्हॅलीबॉल, वेटलिफ्टिंग, मैदानी स्पर्धा,आदी विविध खेळात राज्य स्पर्धेत सहभागी खेळाडूंचा, राष्ट्रीय हॅंडबॉल दिल्ली स्पर्धा महाराष्ट्र संघाचे विद्यालयाचे क्रीडा प्रशिक्षक भूषण राचलवार आदींचा ट्रॅफी व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. सत्कार सोहळ्याला प्राचार्य सुधीर बुटे, ज्येष्ठ पर्यवेक्षक मनोज ढाले, पर्यवेक्षक तथा क्रीडा प्रमुख हरीश राठी, क्रीडा प्रशिक्षक उज्ज्वल मोटघरे,परीक्षा विभाग प्रमुख सुनील सोलव, कनिष्ठ महा. परीक्षा विभाग प्रमुख प्रिया धारपुरे आदी प्रामुख्याने उपस्थित होते. विद्यालयाला क्रीडा स्पर्धेत सुयश मिळाल्याबद्दल प्रेरणा व मार्गदर्शन करणारे व्यवस्थापक मंडळ अध्यक्ष राजेशजी राठी, सचिव डॉ श्यामसुंदरजी लद्धड, उपाध्यक्ष रेखाताई राठी, कोषाध्यक्ष मधुसूदनजी राठी, संचालक मंडळ सदस्य तथा मॅनेजर राहुल लद्धड यांनी यशस्वी खेळाडू व प्रशिक्षकांचे अभिनंदन केले आहे.विद्यालयात वर्षभर क्रीडा प्रशिक्षण, चालविले जातात. यात व्यवस्थापक मंडळाचे संपूर्ण सहकार्य लाभत असल्याची माहिती प्राचार्य सुधीर बुटे यांनी खेळाडूंना केलेय अध्यक्षीय मार्गदर्शनातुन केले. याप्रसंगी क्रीडा प्रशिक्षक उज्वल मोटघरे यांनी विचार व्यक्त केले. संचलन भूषण राचलवार यांनी तर आभार हरीश राठी यांनी मानले.
————-
फोटो- कोंढाळी येथे राष्ट्रीय व राज्य खेळाडूंचा सत्कार करतांना मान्यवर

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *