डॉक्टरवर हल्ला करणाऱ्या वाघिणीचा मृत्यू ताडोबा-अंधारी व्याघ्रप्रकल्पातील पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. रविकांत खोब्रागडे यांचेवर हल्ला करणारी वाघीण मृतावस्थेत आढळली
Summary
चंद्रपूर – ताडोबा-अंधारी व्याघ्रप्रकल्पातील पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. रविकांत खोब्रागडे यांच्यावर हल्ला करून त्यांना जखमी करणारी वाघीण शनिवारी मृतावस्थेत आढळली. सदर प्रकार शनिवारी सकाळी १० वाजता उघडकीस आला. मोठ्या प्रमाणात झालेल्या बाह्य जखमांमुळे शरीरात आंतरस्राव होऊन सदर वाघिणीचा मृत्यू झाल्याचा प्राथमिक […]
चंद्रपूर –
ताडोबा-अंधारी व्याघ्रप्रकल्पातील पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. रविकांत खोब्रागडे यांच्यावर हल्ला करून त्यांना जखमी करणारी वाघीण शनिवारी मृतावस्थेत आढळली. सदर प्रकार शनिवारी सकाळी १० वाजता उघडकीस आला. मोठ्या प्रमाणात झालेल्या बाह्य जखमांमुळे शरीरात आंतरस्राव होऊन सदर वाघिणीचा मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.
ताडोबा-अंधारी व्याघ्रप्रकल्पातील डोनी-१च्या वनरक्षकांना नियमित गस्तीमध्ये गावापासून सुमारे दीड किमी अंतरावर दाट झुडपाखाली वाघीण निपचित पडून असल्याची दिसून आली. तिच्या उपचारासाठी जवळ गेले असता गुरुवारी वाघाने केलेल्या हल्ल्यात प्रकल्पाचे पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. रविकांत खोब्रागडे जखमी झाल्याची घटना घडली होती. त्यानंतर ती पळून गेली. पण, तिच्यावर विशेष लक्ष ठेवण्यात आले. बफर क्षेत्राच्या मूल वनपरिक्षेत्रातील जानाळा उपक्षेत्रात डोणी-१ नियतक्षेत्रात कक्ष क्रमांक ३२७मध्ये शनिवारी विशेष निरीक्षणादरम्यान क्षेत्रीय कर्मचाऱ्यांना सकाळी वाघीण मृतावस्थेत आढळली. सदर घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी प्रकल्पाचे अधिकारी व कर्मचारी दाखल झाले. त्यानंतर वाघिणीचा मृतदेह चंद्रपुरातील प्राथमिक उपचार केंद्रात आणून डॉ. पी. डी. कडूकर, डॉ. कुंदन पोडचेलवार व डॉ. बावने यांनी शवविच्छेदन केले. यावेळी क्षेत्रसंचालक डॉ. जितेंद्र रामगावकर, उपसंचालक जी. गुरुप्रसाद यांच्यासह अन्य अधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते. त्यानंतर वाघिणीचे दहन करण्यात आले.
विक्की नगराळे
तालुका व चंद्रपुर
शहर प्रतिनिधी
चंद्रपुर