डाटा एन्ट्री प्रशिक्षणाचा मोफत लाभ घ्यावा.
Summary
🔹 स्वतंत्र व्यवसायासह शासकीय नोकरीत प्राधान्य. गडचिरोली/ प्रतिनिधी दिनांक :- ११/१/२०२५:- गुरुदेव बहुउद्देशीय संस्था गडचिरोलीच्या वतीने १८ ते २६ वयोगटातील सर्व युवक – युवतींना एक महिना कालावधीचे डाटा एन्ट्रीचे मोफत प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले आहे. डाटा एन्ट्रीचे प्रशिक्षण घेतल्यानंतर […]
![](https://policeyoddha.com/wp-content/uploads/IMG-20250112-WA0004.jpg)
🔹 स्वतंत्र व्यवसायासह शासकीय नोकरीत प्राधान्य. गडचिरोली/ प्रतिनिधी दिनांक :- ११/१/२०२५:- गुरुदेव बहुउद्देशीय संस्था गडचिरोलीच्या वतीने १८ ते २६ वयोगटातील सर्व युवक – युवतींना एक महिना कालावधीचे डाटा एन्ट्रीचे मोफत प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले आहे. डाटा एन्ट्रीचे प्रशिक्षण घेतल्यानंतर घर बसल्या अनेकविध क्षेत्रात संगणक, लॅपटॉप, मोबाईलवर काम करुन आर्थिक मोबदला मिळविता येतो. याबरोबरच विविध प्रकारच्या खाजगी कंपन्या, औद्योगिक, संशोधन , आरोग्य विभाग याबरोबरच विविध क्षेत्रात नोकरी मिळविता येते. या प्रशिक्षणासाठी प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या बारावी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांनी आपल्या शैक्षणिक कागदपत्रांच्या साक्षांकित प्रतीसह डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्रशिक्षण केंद्र पालोरा रोड , भारत गॅस जवळ आरमोरी जिल्हा गडचिरोली येथे 7240028767 या मोबाईलवर संपर्क साधावा. असे आवाहन प्रशिक्षण समन्वयक योगिताताई अलोने यांनी केलेले आहे.