ठाणे येथील शासकीय रुग्णालयात रुग्णांच्या मृत्यूची घटना अत्यंत वेदनादायी चौकशीसाठी समिती नेमणार – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
Summary
ठाणे, दि.13 : ठाणे (कळवा) येथील शासकीय रुग्णालयात रुग्णांच्या मृत्यूची घटना अत्यंत वेदनादायी आहे सदरची घटना शासनाने अत्यंत गांभीर्याने घेतली असून सखोल चौकशी करण्यासाठी आरोग्य संचालकांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली जाईल. समितीचा अहवाल येईल त्यानुसार पुढील कारवाई करण्यात येईल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री […]
ठाणे, दि.13 : ठाणे (कळवा) येथील शासकीय रुग्णालयात रुग्णांच्या मृत्यूची घटना अत्यंत वेदनादायी आहे सदरची घटना शासनाने अत्यंत गांभीर्याने घेतली असून सखोल चौकशी करण्यासाठी आरोग्य संचालकांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली जाईल. समितीचा अहवाल येईल त्यानुसार पुढील कारवाई करण्यात येईल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.
सातारा जिल्ह्यातील दरे येथे माध्यम प्रतिनिधींशी ते बोलत होते. यावेळी उत्पादन शुल्क मंत्री आणि ठाणे तसेच सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई, जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी उपस्थित होते.
श्री. शिंदे म्हणाले की, ठाणे येथील रुग्णालयात घडलेली रुग्णांच्या मृत्यूची घटना दुर्दैवी आहे. रुग्णालय प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार यातील काही रुग्ण हे अत्यंत क्रिटिकल स्थितीत दाखल झाले होते, काही रुग्ण खाजगी रुग्णालयातूनही संदर्भित झाले होते. वेगवेगळ्या प्रकारच्या आजाराने वेगवेगळ्या दिवशी सदरचे रुग्ण याठिकाणी दाखल झाले होते. या अत्यंत वेदनादायी घटनेबद्दल सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रा. तानाजी सावंत यांच्याशीही बोलणे झाले असून ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराजे देसाई आरोग्य यंत्रणेच्या सातत्याने संपर्कात आहेत.
0000