टोपी की टोपे साहेब?? सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार समायोजनचे काम का होत नाही ??
महाराष्ट्र शासनाला आरोग्य सेवेत कार्यरत असलेल्या कंत्राटी कर्मचाऱ्यांना समान काम समान वेतन दिले जावे. असे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहे. परंतु शासनाच्या आरोग्य सेवा संचालक कार्यालयात काम करीत असलेल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी चुकीचे अहवाल सादर केले आहे. आरोग्य मंत्री यांनीही आता पर्यंत तोंडाला पाने पुसण्याचा,टोपी देण्याचे कामे केले आहेत.खरमाटेचा बाहूला बनून आतापर्यंत केवळ आश्वासन देऊन वेळकाढूपणा केला असल्याचे दिसून येत आहे.. १० — १५ वर्षात शासनकुंत्र्यानी तेच काम केले आहे. त्यामुळे समायोजना बाबत सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशाला /निर्णयाला बगल दिली जात आहे.शासनाने मान. उच्च न्यायालयास लेखी स्वरूपात समायोजन करणे बाबत दिलेले आहे, असे समन्वय समितीच्या वतीने सांगण्यात येते तर सरसकट समायोजन का करित नाही.जाहिराती प्रसिद्ध का केल्या जातात. ? आणि आता हा लुटून बसलेला आणि लुटण्यासाठी समन्वयकाना टे्निंग देण्यात अग्रेसर असणारा खरमाटे आहे तरी कुठे❓ आता बोलत का नाही? सर्वोच्च न्यायालयाने समायोजन विषयक माहिती दिली आहे तरीही शासनाने नवीन भरती प्रक्रिया सुरू का❓ केली. शासन १०- १५ वर्षापासून काम करणाऱ्या आरोग्य कंत्राटी कर्मचाऱ्यांना अगोदर सरसकट सामावून का घेत नाही??अनेक जिल्ह्यातील जाहिरात का प्रकाशित झाल्या केल्या जातात .? जाहिरातीवर लाखो रुपये खर्च ❓केले जाते. सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेश शासनाला मिळाले नाही का❓शासनाचे प्रतिनिधीत्व करणारे टोपी साहेब यांच्या निदर्शनास या बाबी का येत नाही?? झोपेचे सोंग घेऊन अधिवेशनात बोलता येते का.??तरीही भरती प्रक्रिया करण्यासाठी जाहिरात कशा??प्रकाशित झाल्या. हि जनतेच्या पैशाची उधळपट्टी नाही का❓मा. सर्वोच्च न्यायालयाला पदे भरण्यात येणार नाही असे शासनाने लेखी स्वरूपात लिहुन दिले आहे तर तसे पत्र स्कॅन कापी प्रसिद्ध का ❓केली जात नाही.
त्यामुळे आता कंत्राटी कर्मचाऱ्यांचे लाखो रुपये फसुनही घाबरून जायचे नाही❓डिसेंबर २०२० पर्यंत समायोजन करून देण्यात येईल अशी महाराष्ट्र राज्यातील कंत्राटी NHM कर्मचारी यांना खरमाटेंनी आशा दिली होती. वर्ष उलटुन गेले तरीही खरमाटें ची ती आशा अद्यापही प्रत्यक्षात ❓जवळ आली नाही❓. आता ती आशा कुठे आणि कशी पळाली?? टोपी साहेब यांनी तर अधिवेशनात चुकीचे बोलून,खोटे बोलून निलऀजपणाची हद करून टाकली. २०२० च्या दिवाळीत मिळणारी वेतन वाढीची आणि इंक्रिमेंट ची आशा दिली होती ती पळाली कि पळविली गेली? आणि त्यासाठी जबाबदार आहेत तरी कोण??. हे फार मोठे कोडेच आहे. याबाबत अनेक शंका निर्माण झाल्या असून आशा पळविण्याचा डाव शासनाच्या मंत्री आणि अधिकारी यांनी ❓का केला आहे. ही आशा आमच्या NHM कर्मचारी आया.. बहिणींच्या पदरी कधी येणार?? या सारखे अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत. कोविड चे भत्ते आणि वेतन वाढीतील मिळणारे लाभांश समायोजन च्या आशा साठी उपयोगी आणण्यासाठी प्रयत्नशील असलेले समन्वयक वाट पाहत आहेत. ?? हे प्राप्त झालेल्या अॅडिओ क्लिप्स वरून आजही स्पष्ट होते. तरीही ज्यांना अजून ही कळले नसेल त्यांनी आपले जुने pdf फाईल शोधावे व पुन्हा पुन्हा वाचून स्वतः चे समाधान करून घ्यावे असा सल्ला देऊन दिलासा देणारी मंडळी आता आहेत तरी कुठे❓
समायोजन म्हणजे काही पेशंटला गोळ्या देण्या इतके सोपे आहे नव्हते असे सांगितले जाते तर खरमाटे !!! मेहनत करून,,उधार,कर्ज करून गहाण गूठे करून एक…लाख रुपये जमा करणे सोपे आहे का ?? समायोजन च्या नावाखाली सुरू असलेल्या गोरखधंदातुन आर्थिक लुट होत आहे तरीही शासन आणि टोपी मूंग गीळून बसले आहे का ?? खरमाटे साहेब.. आणि राजेश टोपी साहेब फक्त आशा साठीच
संयम बाळगायचा?? सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशाची पायमल्ली होणार नाही आणि रितसर समायोजन होणार या साठी शासनाने तातडीने उपाययोजना करावी. आणि मागील १५ वर्षे पासून कार्यरत असलेल्या NHM कर्मचार्यांना न्याय द्यावा. सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार समायोजनचे काम केले जात नसेल तर .. अंमलबजावणी होत नसेल तर निलऀजपणाची, बेजबाबदारपणाची, लुटमारीची, नाकर्तेपणाची, हदच होऊन जाईल….
मुंबई
प्रतिनिधी.
चक्रधर मेश्राम