टेकाडी शिवारात अवैधरित्या रेती वाहतुक करणाऱ्या ट्रॅक्टर, ट्रॉली ला पकडले कन्हान पोलीसांची कारवाई रेती, ट्रॅक्टर सह एकुण ३,०३,००० रूपयाचा मुद्देमाल जप्त.
कन्हान : – कन्हान पोलीस स्टेशन अंतर्गत टेकाडी शिवारात एक लाल रंगाचा बिना नंबर चा ट्रँक्टर व ट्रॉली कन्हान रोड ने अवैधरित्या रेतीची वाहतुक कर तांना मिळुन आल्याने कन्हान पोलीसांनी एक ब्रास रेती, ट्रॅक्टर व ट्रॉली सह एकुण तीन लाख तीन हजार (३,०३,०००) रूपयाचा मुद्देमाल जप्त करून पोस्टे ला दोन आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे.
प्राप्त माहिती नुसार कन्हान पोलीस स्टेशन चे ए.एस.आई सूर्यभान जळते हे शनिवार (दि.१७) डिसें बर ला सकाळी १० वाजता पासुन ते रविवार (दि.१८) डिसेंबर ला सकाळी १० वाजे पर्यंत डे/नाईट ड्युटी असतांना सहायक पोलीस उप निरीक्षक महादेव सुरजुसे, एनपीसी मंगेश आदी पोलीस कर्मचाऱ्या सह सरकारी वाहनाने साना क्र ४८ / २२ नुसार पोस्टे परि सरात पेट्रोलिंग करित असतांना मौजा टेकाडी शिवार येथे एक लाल रंगाचा स्वराज्य कंपनीचा बिना नंबरचा ट्रक्टर मुंडा व ट्रॉली कन्हान येथे टेकाड़ी रोड ने जात असतांना मिळल्याने कन्हान पोलीसांनी त्यास थांबवुन चेक केले तर त्या मध्ये रेती भरून दिसल्याने सदर चालकास नाव, गाव, वय विचारले व रेतीची रॉयल्टी आणि ट्रॅक्टरचे कागदपत्र आहे का या बाबत विचार पुस केली असता ट्रक्टर चालकाने आपले नाव प्रकाश मुलचंद उईके वय ३५ वर्ष राह. प्रभाग क्र ५ पिपरी-कन्हान असे सांगितले. रॉयल्टी व ट्रक्टरचे कागदपत्र नसल्याचे प्रकाश याने सांगितल्याने कन्हान पोलीसांनी सदर ठिकाणी मौका जप्ती पंचनामा कार्यवाही करून एक ब्रास रेती अंदाजे ३००० रू, एक विना नंबर चा ट्रक्टर मुंडा व ट्राॅली वरचा चेसीस क्र. आरइजीटीबी ०१०११ सह अंदाजे किमत ३,००,००० रूपये असा एकुण ३,०३, ००० रू. (३ लाख ३ हजार) रूपयाचा मुद्देमाल मिळुन आल्याने पंचासमक्ष जप्ती पंचनामा करून मुद्देमाल जप्त करण्यात आला. सदर प्रकरणी कन्हान पोस्टे ला सरकार तर्फे फिर्यादी ए.एस.आई सूर्यभान जळते यांच्या तक्रारीने आरोपी १) प्रकाश मुलचंद उईके, २) आकाश रमेश माहतो यांचे विरुद्ध कलम ३७९, १०९ भादंवि अन्वये गुन्हा दाखल करून पुढील तपास कन्हान पोलीस निरीक्षक विलास काळे यांच्या मार्गदर्शनात कन्हान पोलीस स्टेशनचे ए.एस. आई सूर्यभान जळते हे करीत आहे.
संजय निंबाळकर
राज्य चिफ ब्यूरो
पोलीस योद्धा नेटवर्क चॅनल