झाडाझडती … पॅंथसऀ मिलिंद भवर म्हणतात..?रामायणाच्या कोणत्या आवृत्त्यातील रामाचा जयजयकार करायचा ??
Summary
मुंबई विभागीय प्रतिनिधी चक्रधर मेश्राम. दि. 24 एप्रिल 2021 इसवीसनपूर्व वाल्मिकी रामायणातील रामाचा,?? १२व्या शतकातील कम्पन रामायणातील रामाचा,? १५ व्या शतकातील अध्यात्म रामायणातील रामाचा,?? १६व्या शतकातील तुलसीदास रामायणातील रामाचा??, २० व्या शतकातील राधेश्याम रामायणातील रामाचा,?? ८० च्या दशकातील रामानंद सागर […]
मुंबई विभागीय प्रतिनिधी चक्रधर मेश्राम. दि. 24 एप्रिल 2021
इसवीसनपूर्व वाल्मिकी रामायणातील रामाचा,??
१२व्या शतकातील कम्पन रामायणातील रामाचा,?
१५ व्या शतकातील अध्यात्म रामायणातील रामाचा,?? १६व्या शतकातील तुलसीदास रामायणातील रामाचा??, २० व्या शतकातील राधेश्याम रामायणातील रामाचा,?? ८० च्या दशकातील रामानंद सागर च्या रामायण सीरीयल मधिल फिल्मी रामाचा ?? की गेल्या दसऱ्याला पंतप्रधान मोदी अन राष्ट्रपती कोविंद यांनी मेकअप केलेल्या ज्या नौटंकी कलाकार रामाचे भक्तिभावानं दर्शन घेतलं त्याचा?? ..कारण ?? रामायणाच्या जवळजवळ तीनशे वेगवेगळ्या आवृत्या आहेत. असे पॅंथसऀ मिलिंद भवार यांनी आपले मत व्यक्त केले आहे. वाल्मिकीचा राम हा देव नव्हता तर तुलसीदासाचा राम हा विष्णू अवतार .?? ..जातक कथेतील राम हा सीता चा भाऊ आहे तर जैन कथेतला रावण हा खलनायक नाही, त्यांच्या मते ब्राह्मणांनी रावणाला बदनाम केलंय ….तमिळ मधिल एका रामायणात रावणाचा वध सीता ने केलाय (राम तिचा रथ हाकायला होता) तर एका जैन रामायणात रामाने नव्हे तर लक्ष्मणाने रावणाला मारलंय….दक्षिण भारतात बऱ्याच ठिकाणी रामाची नव्हे तर रावणाची पूजा केली जाते तसंच महाराष्ट्रातील गोंड आदिवासी जमातीचे रामायण प्रचलित रामायणाच्या अगदी उलटं आहे त्यात रावण नायक अन राम खलनायक आहे. रावण हा त्यांच्या संस्कृती चा अविभाज्य भाग आहे…मग सांगा कोणत्या रामाचा जयजयकार करायचा ? भारतातील इत्तर प्रचलित धर्माचे संस्थापक यांच्या जन्मस्थाना बाबत ठोस ऐतिहासिक पुरावे आहेत. जसं, बुद्धाच्या जन्मस्थानी सम्राट अशोकाने स्तंभ उभारलाय, जीसस च्या जन्माचे संदर्भ रोमन अन ज्यू इतिहासकारांनी नोंद केलेत अन पैगंबराच्या जन्माविषयी ही इत्यंभूत माहीती उपलब्ध आहे. तसं रामाच्या जन्माविषयी ठोस काही आहे का ? रामाचा जन्म म्हणे त्रेतायुगातला म्हणजे आज पासून जवळजवळ ९ लाख वर्षांपूर्वीचा अन अयोध्या नगरी (पूर्वीची साकेत ही बुध्द नगरी) वसलीय ती अवघ्या २ हजार वर्षांपूर्वी मग अयोध्येतच रामाचा जन्म झाला याची टोटल कशी लावायची ? तसंही राम हे दशरथ राजाचं पहिलं अपत्य. हिंदू संस्कृतीत पहिलं अपत्य हे आईच्या माहेरी जन्मत अन अयोध्या हे रामाच्या आईचं माहेर निश्चितच नव्हतं….काही का असेना, ९ लाख वर्षांपूर्वी मानव हा प्राणीच अस्तित्वात नव्हता जे काही होती ती जंगली श्वापद… मग राम कुठं बसून कोणावर राज्य करायचा ? अशा जंगली अवस्थेतील रामराज्य नेमकं कसं होतं ? वाल्मिकी रामायणात म्हटलंय की रामाने ११ हजार वर्ष राज्य केलं. मग, ११ हजार वर्ष चाललेल्या रामराज्याच्या किमान ११ चांगल्या गोष्टी सांगता येतील का ? राम मर्यादापुरुषोत्तम होता ना मग लक्ष्मणाचे लग्न झालेलं नाही अशी बतावणी करून शुर्पनखेला का फसवलं ?सुग्रीव अन वाली या दोन सख्या भावांमध्ये प्रॉपर्टी वरून असलेला वाद सामोपचाराने मिटवून त्यांच्यात समेट घडवून आणण्याऐवजी त्या दोघांना युद्धास भाग पाडून स्वतः झाडाच्या आड लपून वालीचा केलेला खून कोणत्या तत्वात बसतो ? रावणाला सरळ युध्दात जिंकता येत नाही म्हणून त्याच्या भावाला राज्याचं आमिष दाखवून रावणाचा केलेला घात हे शूरवीराच लक्षण आहे का ?रावणाला मारल्यानंतर रामाचं सीतेला सांगणं की, ” मी रावणाला तुझ्यासाठी नाही मारलं तर माझ्या इभ्रती साठी मारलंय…तुझ्यावर संशयास जागा आहे…तुला रावणाने स्पर्श केलाय …तुला बघण्याचीही मला ईच्छा नाही…इतक्या दिवसांत रावणाने तुझ्यावर हात टाकला नसेल हे मला पटत नाही म्हणून मी तुझा स्वीकार करु शकत नाही यास्तव मी तुला परवानगी देतो की तु लक्ष्मण, भरत, शत्रुघ्न, सुग्रीव वा बिभीषण हवं त्याच्याबरोबर हवं तिकडे जावून संसार कर …” असं म्हणून जिने त्याची चातकासारखी वाट पाहिली तिला त्याग करणं मर्यादा पुरुषोत्तमच्या कोणत्या व्याख्येत बसतं ? ज्या भावानं आपला संसार सोडून वनवासात जिवापाड साथ दिली त्या लक्ष्मणाला शुल्लकशा कारणावरून रामाने शरयु नदीत आत्महत्या करण्यास भाग पाडलं असं का ? रामराज्य एव्हढं चांगलं होतं तर रामाने ही शेवटी शरयु नदीत उडी घेवून आत्महत्या का केली ? रामायण हे केवळ एक काल्पनिक काव्य आहे जे काळाच्या ओघात बदलत गेलंय. अशा काल्पनिक काव्याला धार्मिक बनवणं ही केवळ एक राजनैतिक खेळी नाही का ? बेरोजगारी, महागाई, भूकमारी ई. ने त्रस्त सर्वसामान्य जनतेनं जाती-धर्माचं जोखड झुगारून एकत्र येवून शासनाला जाब विचारू नये म्हणूनच त्यांना कायमचं एकमेकांविरुद्ध भिडवत ठेवण्यासाठीच हा बेबनाव राज्यकर्ते रचत आलेत ना ? रामायणात मुसलमानांचा उल्लेख नाही मग रामाच्या नावानं मुस्लिमांचा द्वेष का ? बाबरी मशिदीच्या गाभाऱ्यात २२ डिसेंबर १९४९ च्या मध्यरात्री चोरून रामाची दीड फुटी मुर्ती सावरकरवाद्यांनी बसवली अन बाबरी मशीद विरुध्द राम मंदिर हा वणवा पेटवला. राम स्वयंभू भगवान आहे ना मग तो स्वतः अवतरला असता. त्याच्या नावानं असे चिरकूट धंदे करायची काय गरज होती सावरकरवाद्यांना? बाबर च्या नातवाने म्हणजेच अकबराने संस्कृत या लोकल भाषेतील रामायणाला पर्शियन या आंतरराष्टीय भाषेत भाषांतरीत केल्यामुळं खऱ्या अर्थानं रामायण हे महाकाव्य जगभर पोहोचू शकलं हे नाकारता येईल का ? बाबर च्या नावानं विनाकारण बोटं मोडणारे हा इतिहास कसा पुसतील ? रामायणात उल्लेख असलेली अयोध्या नगरी ही नक्की गंगेच्या काठी होती की शरयु नदीच्या तसंच लंका हे नगर सध्याचं श्रीलंका नसून ते ओडिशा वा छोटा नागपूर इतरत्र कुठंतरी असावं या बाबत इतिहासकारांत कमालीचे मतभेद आहेत. अशारित्या, ज्या रामाचा इतिहास ठोस नाही, ?? भूगोल वादग्रस्त आहे अन ज्यानं राज्यकारभाराविषयी नागरीशास्त्रातील किमान एक चांगली गोष्ट सांगितली नाही त्या काल्पनिक का होईना रामाचा जयजयकार कशासाठी करायचा?रामराज्य म्हणजे स्त्री दास्य….शूद्रांना शिक्षण घेण्यापासून मज्जाव ….एक परफेक्ट मनुवादी व्यवस्था*. मग, हे असलं मनुधार्जिणे रामराज्य आणण्याच्या बाता मारणं, त्यासाठी धडपडणे म्हणजे RSS अन त्याच्या परिवाराचा शुध्द बामणी कावा नव्हे का ? (मिलिंद भवार पँथर्स)