जैतपूर येथे छत्रपती शाहू महाराज जयंती साजरी
Summary
गणेश सोनपिंपळे/प्रतिनिधी बहुजन समाजाला मुख्य प्रवाहात आणण्याकरीता सर्वप्रथम ज्यांनी आपल्या कोल्हापूर संस्थानांमध्ये गोर गरिबांच्या, कष्टकरी,कामगार, मजुरांच्या,मुलांसाठी शाळा, कॉलेज , वस्तीगृह,आणि शासकीय, निम शासकीय कार्यालयांमध्ये सर्वप्रथम आरक्षणाची तरतूद करून, सर्वसामान्यांना आपले जीवनमान उंचावता येईल, यासाठी […]

गणेश सोनपिंपळे/प्रतिनिधी
बहुजन समाजाला मुख्य प्रवाहात आणण्याकरीता सर्वप्रथम ज्यांनी आपल्या कोल्हापूर संस्थानांमध्ये गोर गरिबांच्या, कष्टकरी,कामगार, मजुरांच्या,मुलांसाठी शाळा, कॉलेज , वस्तीगृह,आणि शासकीय, निम शासकीय कार्यालयांमध्ये सर्वप्रथम आरक्षणाची तरतूद करून, सर्वसामान्यांना आपले जीवनमान उंचावता येईल, यासाठी प्रयत्न करणारे. तसे अस्पृश्यांना व्यवसाय बनण्यास प्रोत्साहित करणारे आणि मुला-मुलींच्या शिक्षणावर भर देणारे. लोककल्याणकारी राजे, लोकनेते, आरक्षणाचे जनक छत्रपती शाहूजी महाराज यांच्या जैतपूर येथील शाहू महाराज चौकात असलेल्या पूर्णाकृती पुतळ्याला अभिवादन करून छत्रपती शाहू महाराजांची जयंती दिनांक 26 जून रोजी साजरी करण्यात आली.
आपली मुले शिकली पाहिजे, मोठ मोठ्या पदावर गेली पाहिजे ,यासाठी ज्या पालकांनी आपल्या मुलांना शाळेत पाठविले नाही. अशा पालकांवर दंड आकारणारे जगातील पहिले महामानव छत्रपती शाहूजी महाराज होते. ज्यांच्या दूरदृष्टीमुळे व त्यांनी सुरू केलेल्या आरक्षणामुळे आज बहुजन समाजातील लोकांनी आपला विकास साध्य केला आहे. प्रत्येक क्षेत्रामध्ये मोलाच्या कामगिरी आज बहुजन समाजातील मुल मुली बजावीत आहे. शाहू महाराजांनी आपल्या हयातीमध्ये बहुजन समाजाला सांगितले होते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या रूपाने बहुजन समाजाला त्यांचा नेता मिळाला आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी बहुजन समाजाला सांगितले होते की शाहू महाराजांची जयंती ही दसरा दिवाळी सना पेक्षा मोठ्या उत्साहात साजरी करावी. कारण शाहू महाराज नसते तर कदाचित बहुजन समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी या देशातील व्यवस्थेने कधीच पुढाकार घेतला नसता.
छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा शाहू महाराज चौकामध्ये साजरी करण्यात आली याप्रसंगी रोशन फुले सामाजिक कार्यकर्ता तसेच डॉक्टर शंकर कठाने यांनी मार्गदर्शन केले. त्याचप्रमाणे ऍड. राकेश पिल्लारे यांनी सूत्रसंचालन केले तर आभार प्रदर्शन अतुल दोनाडकर यांनी केले .याप्रसंगी उपस्थित ओमकार ब्राह्मणकर ,राहुल राऊत, बळीरामजी पढारे, सौरभ नंदेश्वर, कन्हैया जांभुळकर, रवी पिल्लारे, अरविंद भोयर, संजय उरकुडे, कमलेश सतीमेश्राम, विजय आणि मोठ्या प्रमाणात परिसरातील नागरिक उपस्थित होते.