जेष्ठ नागरिक मंडळाचे संस्थापक अध्यक्ष स्व.कोंडे गुरुजी यांची पुण्यतिथी साजरी व ज्येष्ठांना आरोग्य कार्ड चे वाटप……
Summary
जेष्ठ नागरिक मंडळाचे संस्थापक अध्यक्ष स्व.कोंडे गुरुजी यांची पुण्यतिथी साजरी व ज्येष्ठांना आरोग्य कार्ड चे वाटप…… काटोल-प्रतिनीधी-: जेष्ठ नागरिक मंडळद्वारा सामाजिक बांधिलकीची जाण ठेऊन जेष्ठा करिता शारीरिक व मानसिक आरोग्याचे दृष्टीने सातत्याने कार्यक्रम घेतले जातात. त्याच अनुषगाने मंडळाचे संस्थापक […]

जेष्ठ नागरिक मंडळाचे संस्थापक अध्यक्ष स्व.कोंडे गुरुजी यांची पुण्यतिथी साजरी व ज्येष्ठांना आरोग्य कार्ड चे वाटप……
काटोल-प्रतिनीधी-:
जेष्ठ नागरिक मंडळद्वारा सामाजिक बांधिलकीची जाण ठेऊन जेष्ठा करिता शारीरिक व मानसिक आरोग्याचे दृष्टीने सातत्याने कार्यक्रम घेतले जातात. त्याच अनुषगाने मंडळाचे संस्थापक अध्यक्ष स्व मारोतराव कोंडे गुरुजी यांच्या पुण्यस्मरनाचा तथा आरोग्य कार्ड वाटपाचा कार्यक्रम दि.10 जून 2022 ला मंडळाचे विरंगुळा केंद्रात आयोजित करण्यात आला होता.
या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे कृषी उत्पन्न बाजार समिती चे सभापती श्री चरणसिंगजी ठाकूर यांची उपस्थिती लाभली होती. त्याशिवाय मंचावर अध्यक्ष श्री रमेश तिजारे , उपाध्यक्ष श्री शामरावजी झामडे, सचिव श्री गजाननराव भोयर , माजी अध्यक्ष श्री विनायकराव राऊत व वरिष्ठ महिला नागरिक श्रीमती निर्मलाताई कोंडे उपस्थित होत्या.
स्व. कोंडे गुरुजी यांनी संपूर्ण आयुष्य सामाजिक कार्यात खर्ची घातले.सेवानिवृत्तीनंतर जेष्ठाकरिता काटोल येथे जेष्ठ नागरिक मंडळाची स्थापना दि 10-9-2005 ला केली. त्यांनी विविध लेख,कविता लेखन केले.सेवानिवृत्ती लाभसंबधी पुस्तिका छापून गरजूंना वाटप केल्या. अचानक दि.10-6-2008 ला त्यांचा स्वर्गवास झाला.त्यांच्या कार्याला उजाळा मिळावा म्हणून प्रथमच मंडळाद्वारे पुण्यतिथी साजरी करण्यात आली.
त्यांचा जीवन परिचय देताना स्व. कोंडे गुरुजी हे एक चालते बोलते विद्यापीठ होते, असे गौरोद्गार श्री चरणसिंगजी ठाकूर यांनी काढले. मंडळाने नवीन पिढीला उद्बोधक ठरेल असे कार्यक्रम आयोजित करावे. विरंगुळा केंद्र एक मंदिर असून येथे प्रवेश करताना राजकीय पक्ष भेदाभेद बाहेर ठेवावा. व मंडळाचा विस्तार करावा. मी सर्वतोपरी मदत करतच राहील. असे त्यांनी प्रतिपादन केले. त्याशिवाय स्व कोंडे गुरुजी यांच्या सोबत कार्य केलेले श्री विनायकराव राऊत,श्री गोपाळराव डांगोरे ,श्री नामदेवराव ठोंबरे,श्री शामरावजी झामडे,तसेच श्रीमती निर्मलाताई कोंडे यांनी गुरुजींच्या जीवन कार्याचा पटल सभागृहात सादर केला.
शालिनीताई मेघे हॉस्पीटल अँड रिसर्च सेंटर वानाडोंगरी नागपुर येथील आरोग्य कार्ड चे ज्येष्ठांना श्री चरणसिंगजी ठाकूर यांचे हस्ते वाटप करण्यात आले.
ज्येष्ठांना डायरी व पेन देऊन सामूहिक वाढदिवस साजरा करण्यात आला. उपस्थितांना बर्फी वाटप करण्यात आली. कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती पूजन,खरा तो एकची धर्म या समूह गीताने तर कार्यक्रमाची सांगता पसायदानाने करण्यात आली.मंडळाचे सचिव श्री गजाननराव भोयर यांनी प्रस्तावनेतून आरोग्य शिबिराची माहिती दिली तसेच सूत्र संचालनाचे कार्य पार पाडले . मंडळाचे अध्यक्ष श्री रमेशजी तिजारे यांनी उपस्थितांचे आभार मानले.
कार्यक्रमाचे यशस्वीतेसाठी मंडळाचे संचालक श्री हितेंद्र गोमासे,श्री रामदास कळंबे,श्रीमती दुर्गाताई कडू तथा श्री सुरेशराव येवले ,श्री हनुमंतराव कुहिटे यांचे सहकार्य लाभले.