BREAKING NEWS:
आरोग्य गडचिरोली महाराष्ट्र हेडलाइन

जेष्ठांचा आरोग्य हा खरा – ठेवा आरोग्य तपासणी शिबिरातून जपुया आपुल्या वृद्धांचा सन्मान मा.खा. डॉ. अशोकजी नेते यांचे शिबिरात प्रतिपादन येवली येथे जेष्ठ नागरिक आरोग्य तपासणी शिबिर

Summary

गडचिरोली (दि. २४ सप्टेंबर २०२५) : येवली (ता. गडचिरोली) येथे जय तुळजाई ग्रामीण बहुउद्देशीय स्वयंसेवी संस्था, उमरसरा, जि. यवतमाळ व नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ सोशल डिफेन्स (मिनिस्ट्री ऑफ सोशल जस्टीस अँण्ड एम्पावरमेंट) यांच्या सहकार्याने तसेच संदेश गडचिरोली व आरोग्य पथक, येवली […]

गडचिरोली (दि. २४ सप्टेंबर २०२५) :
येवली (ता. गडचिरोली) येथे जय तुळजाई ग्रामीण बहुउद्देशीय स्वयंसेवी संस्था, उमरसरा, जि. यवतमाळ व नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ सोशल डिफेन्स (मिनिस्ट्री ऑफ सोशल जस्टीस अँण्ड एम्पावरमेंट) यांच्या सहकार्याने तसेच संदेश गडचिरोली व आरोग्य पथक, येवली यांच्या संयुक्त विद्यमाने प्राथमिक आरोग्य उपकेंद्र, येवली येथे जेष्ठ नागरिकांसाठी आरोग्य तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले.

या शिबिराचे उद्घाटन माजी खासदार तथा भाजपा अनुसूचित जनजाती मोर्चाचे राष्ट्रीय महामंत्री डॉ. अशोकजी नेते यांच्या शुभहस्ते संपन्न झाले.

उद्घाटनप्रसंगी बोलताना मा.खा. डॉ. अशोकजी नेते म्हणाले :“वय वाढत असताना नियमित आरोग्य तपासणी करणे अत्यंत आवश्यक आहे. लक्षणे दिसेपर्यंत थांबण्यापेक्षा वेळोवेळी तपासणी करून योग्य औषधोपचार घेणे हीच खरी सजगता आहे. वृद्धांचा सन्मान हीच खरी सेवा आहे.

जेष्ठ नागरिकांच्या आरोग्य सुरक्षेसाठी देशाचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी ‘आयुष्मान भारत योजना’ अस्तित्वात आणली, ज्यामुळे ग्रामीण व सामान्य नागरिकांनाही मोठ्या प्रमाणावर मोफत व सुलभ आरोग्यसेवा मिळू लागली आहे. मोदीजींच्या दूरदृष्टीमुळे आज देशात आरोग्य क्षेत्रात मोठी क्रांती घडली असून, स्वच्छता, संतुलित आहार व सकारात्मक विचारसरणी यावर भर दिला जात आहे. यामुळेच नागरिकांचे आयुष्य निरोगी, सुरक्षित व समाधानकारक होत आहे. जेष्ठ नागरिकांनी या उपक्रमांचा अवश्य लाभ घ्यावा.”असे प्रतिपादन मा.खा.डॉ. अशोकजी नेते यांनी केले.

यावेळी डॉ. नेते यांनी स्वतःची आरोग्य तपासणी करून घेत शिबिराच्या उपयुक्ततेचे कौतुक केले तसेच आयोजकांचे मनःपूर्वक आभार मानले.

*जेष्ठ नागरिकांसाठी उपयुक्त तपासण्या*
या शिबिरात तज्ञ डॉक्टरांच्या चमूद्वारे रक्तदाब, रक्तशर्करा, मुखरोग, दृष्टी तपासणी आदी तपासण्या करण्यात आल्या. तसेच जेष्ठ नागरिकांना मोफत औषधोपचारही उपलब्ध करून देण्यात आले.

या प्रसंगी वैद्यकीय अधिकारी डॉ. राजकुमार पटेल, प्रकल्प अधिकारी आकाश धुरट, सरपंच युवराज भांडेकर, दंतवैद्यकीय अधिकारी डॉ. अंकीता धाकडे, फार्मासिस्ट शेट्टी सर, गुरुदास सेमस्कर, ग्रामपंचायत सदस्य चोखाजी बांबोळे यांची उपस्थिती लाभली.

या उपक्रमामुळे येवली परिसरातील जेष्ठ नागरिकांना निरोगी आयुष्य जगण्याचा नवा आत्मविश्वास मिळाल्याचे समाधान आयोजकांनी व्यक्त केले.

 

पोलीस योद्धा नेटवर्क न्यूज
गडचिरोली चामोर्शी
प्रतिनिधी
गजानन पुराम
मो. 7057785181

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *