महाराष्ट्र मुंबई हेडलाइन

जुनी पेंशन योजना लागू होईपर्यंत लढा देणार ! अरविंद सावंत

Summary

मुंबई महापालिकेतील दि. ५ मे २००८ नंतर नियुक्त झालेल्या सर्वच कर्मचार्यांना ‘जुनी पेंशन योजना’ लागू करावी यासाठी आपण अगोदरपासुनच आग्रही असुन,राज्य शासनाच्या दि. २/२/२४ रोजीच्या निर्णयानुसार दि.५ मे २००८ पुर्वी भरतीप्रक्रिया सुरु झालेल्या कर्मचार्यांना जुन्या पेंशन योजनेत समाविष्ट केलेच पाहिजे […]

मुंबई महापालिकेतील दि. ५ मे २००८ नंतर नियुक्त झालेल्या सर्वच कर्मचार्यांना ‘जुनी पेंशन योजना’ लागू करावी यासाठी आपण अगोदरपासुनच आग्रही असुन,राज्य शासनाच्या दि. २/२/२४ रोजीच्या निर्णयानुसार दि.५ मे २००८ पुर्वी भरतीप्रक्रिया सुरु झालेल्या कर्मचार्यांना जुन्या पेंशन योजनेत समाविष्ट केलेच पाहिजे तसेच जुन्या पेंशन योजनेसाठीचा लढा शेवटपर्यंत दिला जाईल असे प्रतिपादन शिवसेना- उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार श्री.अरविंद सावंत यांनी केले.
“म्युनिसिपल कर्मचारी कामगार सेने” च्या वतीने आयोजित शिवसेना भवन येथील मेळाव्यात ते बोलत होते.
सदर विषयी दि. ७/१०/२०२५ रोजी महापालिका आयुक्तांसोबत यशस्वी बैठक घडवुन आणणारे तसेच महापालिकेच्या निवडणूक आचारसंहितेच्या अगोदर परिपत्रक काढले जावे यासाठी प्रयत्नशील असलेले मा. खासदार अरविंद सावंत साहेब यांनी केलेल्या सहकार्याबद्दल अध्यक्ष बाबा कदम यांनी त्यांचे जाहीर आभार मानले.
LSGD व LGS पदवीका उत्तीर्ण कर्मचार्यांची बंद केलेली वेतनवाढ चालू करणे, वेतन विसंगति कमिटीचा अहवाल लागू करणे, प्रलंबित ANM चा जलद गतीने निपटारा करणे, दिवाळी बोनस ई. बाबत करण्यात आलेल्या पाठपुराव्याबाबत उपाध्यक्ष डॉ. संजय कांबळे-बापेरकर यांनी मार्गदर्शन केले.
सदर मेळाव्यात सरचिटणिस सत्यवान जावकर व कार्याध्यक्ष सुनिल चिटणिस यांनी मार्गदर्शन केले, सुत्रसंचलन चिटणिस संजय वाघ यांनी केले. उपाध्यक्षा रंजनाताई नेवाळकर, सरचिटणिस अॅड.रचना अग्रवाल, चिटणिस हेमंत कदम, वृषाली परुळेकर, अजय राऊत,संदिप तांबे,अतुल केरकर,रामचंद्र लिंबारे*
यांची प्रमुख उपस्थिति लाभली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *