नागपुर महाराष्ट्र हेडलाइन

जीवनोन्नती महिला प्रभाग संघाची चौथी वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न

Summary

पोंभुर्णा -उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान, तालुका अभियान व्यवस्थापन कक्ष पोंभूर्णां अंतर्गत जीवनोन्नती महिला प्रभाग संघाची चौथी वार्षिक सर्वसाधारण सभा आज दिनांक 30 डिसेंबर 2023 रोजी जिल्हा परिषद शाळा नवेगाव मोरे , प्रभागसंग कार्यालय परिसर येथे पार पडली. यावेळी […]

पोंभुर्णा -उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान, तालुका अभियान व्यवस्थापन कक्ष पोंभूर्णां अंतर्गत जीवनोन्नती महिला प्रभाग संघाची चौथी वार्षिक सर्वसाधारण सभा आज दिनांक 30 डिसेंबर 2023 रोजी जिल्हा परिषद शाळा नवेगाव मोरे , प्रभागसंग कार्यालय परिसर येथे पार पडली.
यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष मा. श्रीमती ललिता तेजराज पोरटे अध्यक्ष जीवनोन्नती प्रभाग संघ घोसरी चिंतलधाबा प्रभाग, कार्यक्रमाचे उद्घाटक मा. श्री. बाम्बोडे बँक मॅनेजर बँक ऑफ इंडिया नवेगाव मोरे , प्रमुख मार्गदर्शक मा. श्री. गजानन भिमटे, तालुका अभियान व्यवस्थापक, तालुका अभियान व्यवस्थापन कक्ष पोभुरणा प्रमुख उपस्थिती सरपंच साहेब नवेगाव मोरे, सौ. स्मिता आडे तालुका समन्वयक, प्रभागसंघ सचिव मा. दुशांता सलाम व कोषाध्यक्ष मा. भाग्यश्री देठे, तसेच प्रभाग समन्वयक श्री सुरेश खोब्रागडे , श्री संघर्ष रंगारी प्रभाग समनव्यक नि सेंद्रिय शेती ,कार्ड शेतकरी कंपनी चे सर्व संचालक व प्रभागातील सर्व व्यवस्थापक, सर्व कॅडर्स, ग्रामसंघाचे पदाधिकारी व सदस्या महिला यांची उपस्थिती होती.
सर्वप्रथम दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाचे उद्घाटन, कार्यक्रमाचे अध्यक्ष तथा उद्घाटक व इतर प्रमुख पाहुणे यांच्या उपस्थितीत संपन्न झाले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सौ. विमल एम वाकुडकर प्रभागसंघ व्यवस्थापक यांनी केले. प्रभाग संघाचे लेखापाल सौ शुभांगी सोनटक्के यांनी वार्षिक सभेच्या विषय पत्रिकेनुसार एक एक विषय वाचन करून, सर्वानुमते निर्णयाला मंजुरी घेण्यात आली. उपस्थित प्रमुख पाहुण्यांचे जीवनोन्नती प्रभाग संघाच्या सक्षमीकरण बाबत विविध विषयावर मार्गदर्शन करण्यात आले. यात प्रामुख्याने प्रभाग संघाची मागील चार वर्षाची वाटचाल, प्रभाग संघांतर्गत समूह, ग्रामसंघ व प्रभागाच्या मार्फत सुरू असलेल्या विविध उपजीविका, सामाजिक समावेशन, वित्तीय समावेशन, शासनाच्या सामाजिक योजना, वित्तीय बँकेचे सेवा इत्यादी विषयावर विस्तृत असे मार्गदर्शन झाले. प्रभागाचे माजी प्रभाग समनव्यक सत्कारमूर्ती मा. श्री अहिरकर सरानी जीवनोन्नती प्रभागसंघ साठी आपली भुमिका व जबाबदारी उत्कृष्ट पणे पार पाडून जीवनोन्नती प्रभागसंघ ला माडेल प्रभागसंघ घडवले त्यांच्या या कार्याची शाल श्रिफळ व गिफ्ट देऊन सत्कार करण्यात आला व प्रभागातील उत्कृष्ट काम करणाऱ्या प्रभागसंघ ची लिपीका सौ. शुभांगी सोनटक्के यांनी प्रभागसंघाची कर्ज वसुली साठी ग्रामसंघ ना नियमित पाठपुरावा करून सन 2022-2023 या वर्षात 97% व्याज वसुली व 96% मुद्ल्ल वसुली साठी दशसुत्री चे 4सुत्र नियमित कर्ज परतफेड या सुत्राचा नियमाचे पालन करून प्रभागसंघ चे लेखापाल चे कर्तव्य प्रामाणिक पणे पार पाडले त्या प्रित्यर्थ त्याच्या सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाचे सूत्र संचालन सौ.ताई के माहोरकर यांनी केले तर आभार प्रदर्शन शुभांगी गोवर्धने यांनी केले.
या कार्यक्रमाच्या यशस्वी करिता नियोजित समिती सदस्या, प्रभागातील सर्व व्यवस्थापक व कॅडर यांच्या अथक परिश्रम घेतले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *