जीजाऊ चौकातील महिलांनी घडवला आदर्श
जीजाऊ चौकातील महिलांनी घडवला आदर्श.
2020-21 या काळात कोरोनामुळे सर्व जनजीवन व्यथित झाले होते. याच काळात कन्नमवार वार्ड क्रमांक 17 मधील जिजाऊ चौक या परिसरातील पाच प्रतिष्ठित नागरिक स्व.आशाताई बुरडकर काकू, स्व. निरगुडवार काकू , स्व. मारोतराव चौधरी, स्व.प्रतिभा बारशिंगे, स्व.सीताबाई पिल्लेवान काकू, मृत्युमुखी पावले .त्यामुळे वार्डातील महिलांनी यावेळेस त्यांना श्रद्धांजली अर्पण होईल असा एक आदर्श संक्रांतिचा कार्यक्रम आयोजित केला. वार्डातील महिलांनी छोटेखानी वान वाटून, वृद्धाश्रमातील वृद्धांना 7 ट्रॉली बॅग व नाष्टा वाटप करून समाजापुढे आदर्श घडविला. यात पुष्पा चापले, रेखा चूधरी, आशा करोडकर, माला कूडे, ज्योती महाजन, सुनीता वरारकर ,वर्षा बुरडकर, जुवारे मॅडम ,माधवी हुलके, हेमा वाढनकर, अर्चना चौधरी, सुवर्णा म्हशाखेत्री, ललिता मस्के ,वंदना रोहनकर, किरण म्हशाखेत्री, नमीता डांगे, संध्या शिवणकर, ज्योती श्रीरामवार ,ज्योती सोनटक्के अंजली पिल्लेवान , अलका गणवीर, विजय रडके, संचुता मुडके , अपर्णा तोटावार, संध्या येलेकर यांनी मृत पावलेल्या मान्यवरांना श्रद्धांजली वाहून त्यांच्या स्मृती निमित्त मातोश्री वृद्धाश्रमातील वृद्धाना 7 ट्रॉली बॅग चे वाटप केले .
प्रा. संध्या येलेकर