जि प उपाध्यक्ष कुंदा राऊत यांनी कोंढाळी आरोग्य केंद्राची तपासणी
कोंढाळी-वार्ताहर
नागपुर जिल्हा परिषदेच्या उपाध्याक्षा व जि प आरोग्य समीती चे अध्यक्ष कुंदा राऊत यांनी 16फेब्रूवारी रोजी सकाळी 10-30वाजता कोंढाळी येथील प्राथमिक आरोग्य केंद्राला भेट दिली. या भेटी दरम्यान प्राथमिक आरोग्य केंद्राच्या आंतर बाह्य परिसराची तपासणीकरून उपलब्ध औषधी साठा,ओ पी डी रूग्ण संख्या,आदी ची पाहणी केली. या दरम्यान प्रा.आ. केंद्रात तपासनी करिता आलेल्या महिला -पुरुष रुग्णांसी संवाद साधला,तसेच प्राथमिक आरोग्य केंद्राअंतरगत उत्कृष्ट कार्य करनार्या कर्मचार्यांचा व वैद्यकिय अधिकार्यांचा उपाध्यक्षांनी सत्कार केला.
या प्रसंगी कोंढाळी प्राथमिक आरोग्य केंद्राअंतरगत 04आरोग्य सेवक,04आरोग्य सेविका, चार शिपाई, 02 रूग्ण वाहिकाचालक, 01लेबॉरटरी तंत्रज्ञान च्या जागा रक्त असल्याची माहिती जि प सदस्या पुष्पाताई चाफले यांनी उपाध्यक्षांना दिली.
जि प उपाध्यक्षा कुंदा राऊत यांना रक्त जागेची पुर्तते बाबद विचारले असता त्यांनी सांगितले की कोंढाळी सह 53प्राथमिक आरोग्य केंद्राअंतरगत रिक्त कामगारांच्या पद भरती बाबद संबधित विभागाला माहीती दिली असून या बाबतीत निवड प्रकिया मार्फत रिक्त पदांचा प्रश्न मार्गी लावला जाईल. त्याच प्रमाणे येथील ग्रामीण रुग्णालयाचे अपुर्ण कामाबाबद विचारले असता त्यांनी सांगितले की हा विषय राज्य सरकार चे अखत्यारीतील असल्याने याचा पाठपुरावा राज्य सरकार कडे करू असे सांगितले.
तसेच माहिती दिली की सध्या स्थितीत प्राथमिक आरोग्य केंद्राअंतरगत प्रसुती साठी आलेल्या रूग्णालाच जेवणाची सोय केली जात होती, आता या पुढे प्रसुती साठी आलेल्या रूग्णासोबत आलेल्या एका सहकार्याची जेवणाची सोय जि प नागपूर चे वतिने करन्यात आली आहे, असे ही उपाध्यक्ष कुंदा राऊत यांनी सांगितले. या प्रसंगी
काटोल पंचायत समिती चे सभापती संजय डांगोरे, उपसभापती निशिकांत नागमोते, प्रकाश वसू, सरपंच केशवराव धुर्वे, पंचायत समिती सदस्य अरूण उईके, लता ताई धारपुरे,पदम डेहनकर, प्रमोद चाफले, विनोद माकोडे,मोहन ठवळे
नरेश नागपुरे,अन्नू पठाण,कुणाल भांगे,मोहसीन पठाण,
गौरव ठवळे,नौशाद शेख, नितीन ठवळे, तसेच प्राथमिक आरोग्य केंद्राअंतरगत डॉ पियुष खवशी,डॉ आषिश तायवाडे,सह सर्व कर्मचारी वर्ग उपस्थित होता.
