जि प आरोग्य विभाग व्दारे सिंगारदिप ला मच्छरदानी वाटप
नागपूर कन्हान : – जिल्हा परिषद आरोग्य विभाग नागपुर व्दारे राष्ट्रीय किटकजन्य आजाराचा प्रतिबंधक उपाय म्हणुन सिंगारदिप गावात प्रत्येक घरी मच्छरदानीचे वाटप करण्यात आले.
जिल्हा परिषद गोंडेगाव सर्कल अंतर्गत गट ग्राम पंचायत बोरी च्या सिंगारदिप यावात जिल्हा परिषद आरोग्य (हिवताप कार्यलय) विभाग नागपुर यांच्या राष्ट्रीय किटकजन्य आजारांची ( डेंगू ,मलेरिया इ. ) प्रतिबंधक उपाय करण्याकरिता संपूर्ण गावातील प्रत्येक घरच्या नागरिकांना जिल्हा परिषद विरोधी पक्ष उप गटनेता व जि.प.सदस्य वेंकटजी कारेमोरे यांचा प्रमुख हस्ते मच्छरदानी वाटप करण्यात आले. याप्रसं गी ग्रा प बोरी (सिंगारदीप) च्या उपसरपंच सौ शुभांगी अशोक टोहने, ग्रा प सदस्या सौ उषा किशोर दौड़के, अनिल कुथे, आरोग्य सेवक अजय राउत, सुरेंद्र गिरे , धर्मेंद्र गणवीर सह गावकरी मान्यवर प्रामुख्याने उपस्थित होते.