जिवन अनमोल आहे. गाफील न राहता काळजी घेण्याचे डॉ. पालवे यांचे आवाहन
मुंबई प्रतिनिधी चक्रधर मेश्राम. दि. २२ एप्रिल २०२१
कोरोना महामारीचा जगभरासह आपल्या देशातही कहर सुरू झाला आहे .आज देशात दररोज लाखो लोक कोरोनाने संक्रमित होऊन आणि हजारो मृत्यु होत आहेत. अशा महामारीत सर्व दवाखाने कोरोना पेशंटने फुल झाले आहेत. गंभीर रुग्णांसाठी बेड , ऑक्सिजन, व्हेंटिलेटर , इंजेक्शन,औषधी यांचा सर्वत्र तुटवडा निर्माण झाला आहे.
अशा या अतिशय गंभीर महामारीचा वणवा प्रत्येक गावात पोहचला आहे . एकेक करत आपल्या गावात कोरोना पेशंट ची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे .कोरोनाने लाखो लोकांचे मृत्यु देखील झाले आहेत.
या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र ग्रामीण आरोग्य व शिक्षण संस्थेचे अध्यक्ष डॉ विठ्ठल पालवे यांनी सर्व गावकऱ्यांना आपल्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी.नियमित उपचार करून घेण्यासाठी कळकळीची विनंती केली आहे , काळ खुप कठीण आहे ,सर्वांनी आपली स्वतः ची ,आपल्या कुटुंबातील प्रत्येक सदस्यांची काळजी घ्यावी. विनाकारण कुणीही बाहेर फिरू नका . कामानिमित्त बाहेर गेल्यास मास्क ,सॅनेटायझर चा वापर करा. सुरक्षित अंतर पाळा रोगप्रतिकार शक्ती वाढण्यासाठी चे उपाय करा ,जसे गरम पाणी पिणे, काढा पिणे, मल्टी व्हिटॅमिन चे सेवन करावे. अत्यंत महत्वाचे म्हणजे सर्वांनी अर्जंट लस घ्या ।
कुणाला काही लक्षणे जाणवल्यास ताबडतोब उपचार घ्यावा. कुणीही गाफील राहू नका . कुणीही हलगर्जीपणा करू नका . काळ खुप कठीण आहे . अशा कठीण काळात आपण सर्वांनी आपली स्वतः ची ,कुटुंबाची ,गावाची काळजी घ्यावी असा संदेश डॉ.पालवे यांनी दिला.
जिवन अनमोल आहे ।
जिवनाशिवाय बाकी सारे कवडीमोल आहे ।