जिवंत विद्युत तारेचा स्पर्श झाल्याने युवकाचा मृत्यू जबाबदार कंपनीवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी
वरोरा शहरांतर्गत बोर्डा ग्रामपंचायत हद्दीतील विकास नगर येथे एका विद्युत खांबावर डसलाईन इन्फ्रा प्रायव्हेट लिमिटेडच्या कंत्राटदारांनी नेमून दिलेल्या डीपी मेंटेनन्स साठी हा युवक काम करीत असताना विद्युत वहिनीचा शॉक लागल्याने जागीच मृत्यू झाल्याची भीषण घटना घडली.हा अपघात इतका भीषण होता की कर्मचाऱ्याचा हाय टेन्शन पोल वर असलेल्या तारावरच जळून मृत्यू झाला. यासाठी जबाबदार असणाऱ्या कंपनीवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी होत आहे. या कंपनीकडे कुशल/ अकुशल प्रकारचे कर्मचारी काम करतात याची सुद्धा माहिती अजून पर्यंत मिळाली नाही. सदर घटना आज साडेबारा वाजेच्या वरोरा जवळील बोर्डा गावात घडली.
मृतक इसमाचे नाव राजू काशिनाथ भोयर वय 27 राहणार फुकट नगर वरोरा असून तो महावितरण कंपनी च्या कंत्राटदाराकडे काम करीत असल्याची माहिती आहे. पुढील तपास वरोरा पोलीस करीत आहे.
विक्की नगराळे
तालुका व चंद्रपुर
शहर प्रतिनिधी
चंद्रपुर