जिल्ह्यात बोगस डॉक्टर आढळल्यास नागरिकांनी त्यांची तक्रार करावी. जिल्हा प्रशासनाचे आवाहन.
Summary
पोलीस योद्धा न्यूज नेटवर्क भंडारा बोगस वैद्यकीय व्यावसायिकांवर आळा घालण्यासाठी व त्यावर प्रतिबंधात्मक कारवाई करण्याकरिता जिल्हास्तरीय पुनर्विलोकन समितीची सभा नुकतीच पार पडली. जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालय येथे ही बैठक घेण्यात आली. या सभेला जिल्हा शल्य […]
पोलीस योद्धा न्यूज नेटवर्क भंडारा
बोगस वैद्यकीय व्यावसायिकांवर आळा घालण्यासाठी व त्यावर प्रतिबंधात्मक कारवाई करण्याकरिता जिल्हास्तरीय पुनर्विलोकन समितीची सभा नुकतीच पार पडली. जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालय येथे ही बैठक घेण्यात आली. या सभेला जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर दीपचंद सोयाम, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर मिलिंद सोमकुवर, उपजिल्हा पोलीस अधीक्षक नितीन चिंचोलकर, सहाय्यक आयुक्त (औषधी) अन्न व औषध प्रशासन अभी चौवरडोल व तालुका आरोग्य अधिकारी डॉ. एस जी नैतामे, डॉ. सी डब्ल्यू वंजारे आदी सदस्य उपस्थित होते. ग्रामीण भागातील नागरिकांवर योग्य अर्हता नसतानाही बोगस डॉक्टर नागरिकांचे उपचार करत असून त्यांची फसवणूक करीत असतात. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्य व आर्थिक परिस्थितीवर गंभीर परिणाम होत असतो. बोगस डॉक्टरांवर आळा घालण्यासाठी सर्व वैद्यकीय अधिकारी यांनी त्यांच्या तालुक्यात असलेल्या बोगस डॉक्टरांचा शोध घ्यावा. यासाठी पोलीस विभागाची मदत घ्यावी अशा सूचना जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांनी यावेळी दिल्या. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. मिलिंद सोमकुवर यांनी बोगस डॉक्टर संबंधात उपलब्ध असलेली तालुका निहाय ११३ बोगस डॉक्टरांची यादी यावेळी सभेपुढे सादर केली. संबंधित तालुका वैद्यकीय अधिकारी व शहरी भागातील संबंधितांनी बोगस डॉक्टर यांच्या प्रमाणपत्राची पडताळणी करावी व इतर संबंधित कागदपत्र तपासून घ्यावे. तसेच तालुक्यात यांच्या व्यतिरिक्त काही अधिक बोगस डॉक्टर असल्यास त्यांची माहिती सभेत सादर करावी, असे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी संबंधित विभागांना दिले जिल्ह्यातील बोगस डॉक्टरांवर गत कालावधीत झालेल्या कार्यवाहीमध्ये सन १०१८ मध्ये दोन प्रकरणे पोलीस स्टेशन भंडारा व साकोली येथे सुरू असल्याबाबत पोलीस विभागांमध्ये सांगण्यात आले. संशयात्मक तपासणी करणारे बोगस डॉक्टर आढळल्यास नागरिकांनी त्यांची तक्रार पोलीस विभाग किंवा जिल्हा प्रशासनाकडे करण्याचे आवाहन कुंभेजकर यांनी केले.