जिल्हा बँकेतील विजयी उमेदवारांचा शिवसेनेच्या वतीने सत्कार
उसिल्लोड दि.24, औरंगाबाद जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या संचालक पदाच्या निवडणुकीत शेतकरी विकास पॅनेलने बाजी मारली. या पॅनल मधील राज्यमंत्री अब्दुल सत्तार, सिल्लोड कृउबा समितीचे सभापती अर्जुन पा. गाढे, सोयगाव शिवसेना तालुकाप्रमुख प्रभाकर ( आबा ) काळे यांच्या पत्नी सुरेखाताई काळे यांचा दणदणीत विजय झाला. विजया नंतर सोमवार ( दि.22 ) रोजी राज्यमंत्री अब्दुल सत्तार, अर्जुन पा. गाढे तसेच प्रभाकर ( आबा ) काळे यांचे सिल्लोड येथील सेना भवन येथे आगमन होताच शिवसैनिकांच्या वतीने फटाक्यांची आतषबाजी करीत पुष्पगुच्छ देवून सत्कार करण्यात आला.
यावेळी डॉ.मॅचिंद्र पाखरे, शिवसेना उपजिल्हाप्रमुख किशोर अग्रवाल, तालुकाप्रमुख देविदास लोखंडे , शहरप्रमुख रघुनाथ घरमोडे,डॉ. संजय जामकर, पंचायत समितीचे उपसभापती काकासाहेब राकडे, सुदर्शन अग्रवाल, शिवसेना महिला आघाडीच्या दुर्गाबाई पवार, नगरसेविका शकुंतलाबाई बन्सोड, रामसेट कटारिया, नगरसेवक विठ्ठल सपकाळ, सत्तार हुसेन, शंकरराव खांडवे, आसिफ बागवान, रतनकुमार डोभाळ, मतीन देशमुख, जितू आरके, शेख बाबर, मनोज झंवर, शेख सलीम हुसेन , शेख इम्रान ( गुड्डू ) यांच्यासह नॅशनल सूतगिरणी चे संचालक विशाल बावस्कर, मारोती वराडे आदी शिवसैनिकांची उपस्थिती होती.
शेख चांद
प्रतिनिधी