BREAKING NEWS:
महाराष्ट्र हेडलाइन

जिल्हा पोलिस दलास सक्षम करण्यासाठी सर्वकाही देऊ, गुन्हेगारांना पोलिसांचा धाक वाटावा असे वातावरण निर्माण करा – पालकमंत्री धनंजय मुंडे बीड जिल्हा पोलिस दलात 151 मोटारसायकल, 8 स्कॉर्पिओ, 2 डायल 112 व 2 टियूव्ही गाड्या दाखल; मंत्रीमहोदयांच्या हस्ते लोकार्पण संपन्न

Summary

बीड, दि.22 (जि.मा.का.):- बीड जिल्हा पोलिस दलास जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून आवश्यक वाहने उपलब्ध करून देण्यात आली आहेत, या व्यतिरिक्त पोलीस दलास सक्षम करण्यासाठी आवश्यक ते सर्वकाही संसाधने व आधुनिक उपकरणे उपलब्ध करून देऊ, जिल्हा पोलिस दलाने गुन्हेगारी वृत्तीच्या लोकांमध्ये कायद्याचा […]

बीड, दि.22 (जि.मा.का.):- बीड जिल्हा पोलिस दलास जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून आवश्यक वाहने उपलब्ध करून देण्यात आली आहेत, या व्यतिरिक्त पोलीस दलास सक्षम करण्यासाठी आवश्यक ते सर्वकाही संसाधने व आधुनिक उपकरणे उपलब्ध करून देऊ, जिल्हा पोलिस दलाने गुन्हेगारी वृत्तीच्या लोकांमध्ये कायद्याचा धाक निर्माण व्हावा तसेच सर्वसामान्य लोकांना कायद्याचे राज्य आहे अशी जाणीव निर्माण व्हावी असे वातावरण निर्माण करावे, असे आवाहन बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी बीड जिल्हा पोलिस दलास केले आहे.

बीड जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून जिल्हा पोलिस दलास 151 मोटारसायकल, 8 स्कॉर्पिओ, डायल 112 पथकासाठी 2 बोलेरो, तसेच 2 टियूव्ही गाड्या असे एकूण 165 वाहने खरेदी केली असून, आज धनंजय मुंडे यांच्या हस्ते या गाड्यांचे एका दिमाखदार सोहळ्यात लोकार्पण करण्यात आले.

यावेळी पालकमंत्री धनंजय मुंडे यांना बीड पोलिसांच्या वतीने मानवंदना देण्यात आली, तसेच सर्व वाहनांची रंगीत परेड करून त्याद्वारे मोटारसायकल उभ्या करून डायल 112 आकार साकारण्यात आला.  यावेळी ते बोलत होते. या लोकार्पण सोहळ्यासाठी आमदार संदीप शिरसागर,आमदार संजय दौंड, जिल्हाधिकारी रवींद्र जगताप, जिल्हा पोलीस अधीक्षक आर.राजा, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी,अजित कुंभार, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष बजरंग सोनवणे यांची प्रमुख उपस्थिती होती.

जिल्ह्यात प्रत्येक पोलीस ठाण्यांतर्गत 1 बीट अंमलदार या महिला असणार आहेत. अशा प्रकारची संधी बीड जिल्ह्यात पहिल्यांदाच देण्यात आली आहे. याशिवाय 6 पिंक मोबाईल पथके महिला सुरक्षेसाठी विशेष स्थापन करण्यात आली आहेत. जिल्ह्यातील गुन्हेगारीवर आळा घालण्यासह कोविड विषयक निर्बंधाचे पालन करण्यासाठी संपूर्ण पोलीस दल अविरतपणे कार्यरत आहे, याबद्दल मंत्री श्री. मुंडेंनी पोलिसांचे कौतुक करत उत्तम कामगिरीची अपेक्षा व्यक्त केली.

प्रास्ताविक करताना जिल्हा पोलीस अधीक्षक श्री आर राजा म्हणाले, पोलीस दलाच्या कार्यक्षमतेत वाढ करण्यासाठी महत्त्वपूर्ण बदल करण्यात येत आहे. प्रत्येक पोलिस ठाणे अंतर्गत एक महिला बीट अंमलदार ह्याचा अंतर्गत कारभार चालेल याचा उपयोग महिलांना निसंकोचपणे आपली तक्रार पोलिसांकडे देण्यासाठी उपयोग होईल. यासह आजच्या लोकार्पण सोहळ्यातील प्राप्त वाहने, पोलीस ठाण्यांमध्ये सकारात्मक बदल, जप्त केलेल्या साहित्याची निर्गती, परिसर स्वच्छता, रंगरंगोटी यामुळे येणाऱ्या नागरिकांना आल्हाददायक व दिलासा वाटेल असे वातावरण तयार होईल असे श्री आर. राजा म्हणाले.

याप्रसंगी गेल्या एक अधिक वर्षाच्या काळात कोविड विषयक कामगिरी व पोलीस दलापुढील विविध आव्हाने या दरम्यान बीड पोलिसांनी केलेल्या उत्कृष्ट कामगिरीचा लेखाजोखा मांडणारे ‘ध्यासपर्व’ या विशेष पुस्तकाची निर्मिती बीड जिल्हा पोलिसांनी केली असून, पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या हस्ते व मान्यवरांच्या उपस्थितीत या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. कार्यक्रमास  माजी आमदार सलीम सय्यद, माजी आमदार सुनील धांडे, सचिन मुळुक, कुंडलिक खांडे, राजकिशोर मोदी आदी मान्यवरांसह पोलीस आणि शासकीय अधिकारी कर्मचारी यांची मोठी उपस्थिती होती. लोकार्पण सोहळ्याचे आभार प्रदर्शन अपर पोलीस अधीक्षक सुनील लांजेवार यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *