क्राइम न्यूज़ भंडारा महाराष्ट्र हेडलाइन

जिल्हा पोलिसांकडून अवैध दारू व जुगार अड्ड्यांवर कारवाई; 3.19 लाखांचा मुद्देमाल जप्त

Summary

भंडारा, दि. 16 जुलै 2025 — जिल्हा पोलीस अधीक्षक श्री. नुरूल हसन यांच्या मार्गदर्शनाखाली भंडारा जिल्ह्यात अवैध दारू व जुगार अड्ड्यांवर धाड टाकून एकूण ₹3,19,490/- किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई पोलीस उपअधीक्षक श्री. ईश्वर कातकडे यांच्या देखरेखीखाली […]

भंडारा, दि. 16 जुलै 2025 —
जिल्हा पोलीस अधीक्षक श्री. नुरूल हसन यांच्या मार्गदर्शनाखाली भंडारा जिल्ह्यात अवैध दारू व जुगार अड्ड्यांवर धाड टाकून एकूण ₹3,19,490/- किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई पोलीस उपअधीक्षक श्री. ईश्वर कातकडे यांच्या देखरेखीखाली विविध पोलीस ठाण्यांमार्फत करण्यात आली.

जुगार अड्ड्यांवर धाड आणि कारवाई (एकूण जप्त माल – ₹37,638/-):

1. पोलीस स्टेशन करढी
आरोपी: गिन्नीराव रघुनाथ भारतकर व सोनू अग्रवाल
जप्त माल: ₹10,575/- (मोबाईल, सट्टा कागद, पेन व रोख रक्कम)

2. पोलीस स्टेशन जवाहरनगर
आरोपी: प्रज्वल ज्ञानेश्वर ढोमणे
जप्त माल: ₹16,350/- (कॉम्प्युटर उपकरणे, राऊटर, प्रिंटर, टेबल, खुर्ची व ₹150/- रोख)

3. पोलीस स्टेशन आंधळगाव
आरोपी: सिकंदर रमजान छबारे
जप्त माल: ₹193/- (सट्टा कागद, डॉटपेन, रोख रक्कम)

4. पोलीस स्टेशन लाखांदूर
आरोपी: 6 आरोपींविरुद्ध कारवाई
जप्त माल: ₹10,520/- (रोख रक्कम व सट्टा कागद)

 

दारू अड्ड्यांवर धाड आणि कारवाई (एकूण जप्त माल – ₹2,81,852/-):

1. पोलीस स्टेशन भंडारा (2 कारवाया)
आरोपी: धनराज जयदेव नंदनवार व अरुणा गोस्वामी
जप्त माल: 50 लिटर हातभट्टी दारू – ₹10,500/-

2. पोलीस स्टेशन कारधा
आरोपी: अनवर टेंभुर्णे
जप्त माल: ₹312/- (देशी दारू)

3. पोलीस स्टेशन वरठी
आरोपी: विमलाकर लोनारे
जप्त माल: ₹2,000/- (10 लिटर दारू)

4. पोलीस स्टेशन तुमसर (4 कारवाया)
आरोपी: दीपक धुर्वे, चंद्रकला नेवारे, कुंजीलाल डोंबनिके, रमेश सेलोटे
जप्त माल: ₹2,13,250/- (मोफत पास सडवा, हातभट्टी दारू, मोपेड इ.)

5. पोलीस स्टेशन गोबरवाही
आरोपी: शकुबाई वागळे
जप्त माल: ₹600/- (6 लिटर हातभट्टी दारू)

6. पोलीस स्टेशन साकोली
आरोपी: रोशन बडोले
जप्त माल: ₹53,040/- (288 नग देशी दारू व एक मोपेड)

7. पोलीस स्टेशन लाखनी
आरोपी: अरविंद वासनिक
जप्त माल: ₹500/- (5 लिटर हातभट्टी दारू)

8. पोलीस स्टेशन पालांदूर
आरोपी: नितेश काळे
जप्त माल: ₹1,050/- (30 नग टिल्लू बाटल्या)

9. पोलीस स्टेशन अड्याळ
आरोपी: रमेश सेलोटे
जप्त माल: ₹21,050/- (100 किलो सडवा मोहपास, लोखंडी ड्रम, टिन पिपे)

 

एकूण कारवाईचा तपशील:

जुगार प्रकरणे: 4

दारू प्रकरणे: 13

एकूण मुद्देमाल: ₹3,19,490/-

 

पोलीस अधीक्षकांचे निर्देश व यशस्वी कारवाई

या संयुक्त कारवाईमुळे भंडारा जिल्ह्यातील अवैध धंद्यांवर मोठ्या प्रमाणात आळा बसला आहे. श्री. नुरूल हसन, जिल्हा पोलीस अधीक्षक, यांनी जिल्ह्यातून अवैध दारू व जुगाराचे उच्चाटन करण्याचे निर्देश दिले होते. त्या अनुषंगाने संबंधित पोलीस ठाण्यांचे ठाणेदार व पोलीस कर्मचारी यांनी यशस्वी कारवाई केली.

बातमीसाठी संपर्क:
जनसंपर्क अधिकारी,
पोलीस अधीक्षक कार्यालय, भंडारा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *