जिल्हा परिषद शाळा बंद आणि जन सुरक्षा कायद्याविरोधात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना समता सैनिक दलाचे निवेदन लोकशाही नष्ट करून हुकुमशाही व गुलामीकडे नेणारा निर्णय – रोशन फुले
प्रतिनिधी: राज्य शासनाच्या निर्णयांविरोधात समता सैनिक दल, लाखांदूर तालुक्याच्या वतीने ४ ऑगस्ट रोजी मा. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन सादर करण्यात आले. हे निवेदन लाखांदूरचे तहसीलदार पवार यांच्या मार्फत देण्यात आले.
समता सैनिक दलाने
या निवेदनात दोन प्रमुख मागण्या मांडण्यात आल्या आहेत.एक राज्य सरकारने घेतलेला १८,००० जिल्हा परिषद शाळा बंद करण्याचा निर्णय तात्काळ मागे घेण्यात यावा. आणि
दुसरी “विशेष जन सुरक्षा कायदा २०२४” रद्द करण्यात यावा.
समता सैनिक दलाचे तालुका प्रमुख रोशन फुले यांनी म्हटले की, “या दोन्ही निर्णयांचा ग्रामीण, आदिवासी, दलित आणि मागासवर्गीय समाजावर गंभीर परिणाम होईल. शिक्षणाचा अधिकार, अभिव्यक्ती स्वातंत्र्य, संघटनेचा हक्क आणि आंदोलने करण्याचे हक्क यावर सरळ आघात होतोय.”यामुळे संविधानाने दिलेल्या मूलभूत अधिकाराचे हनन होत आहे.
त्यांनी असे ही निदर्शनास आणले की शाळा बंद केल्याने विद्यार्थ्यांचे शिक्षण अडचणीत येईल, विशेषतः मुलींचा शाळा सोडण्याचा दर वाढेल.
जन सुरक्षा कायदा कलम १४, १९, २१ आणि २२ च्या विरोधात जातो, त्यामुळे हा कायदा असंवैधानिक आहे.
राज्य सरकारने या मागण्यांचा गांभीर्याने विचार करावा, तसेच लोकशाही मार्गाने होणाऱ्या आंदोलने व मतप्रदर्शनांचा सन्मान करावा, अशी मागणी या निवेदनात करण्यात आली आहे.
“जय भीम, जय संविधान, जय भारत” अशा घोषणांनी निवेदनाची सांगता करण्यात आली. निवेदन देताना रोशन फुले स. सै.द. ता.प्र. लाखांदूर, हरिदासजी खोब्रागडे सा. कार्य. खुशाल बोरकर स.सै. द. अशोकजी रामटेके,अर्चना सूर्यवंशी, गंगासागर सूर्यवंशी, हिराबाई उके, देवला सूर्यवंशी, हेमराज रामटेके, शर्मिला बडोले, हिरा बडोले, राजन वासनीका,निर्भय गायकवाड, वनमाला सुखदेवे,नीरुताई जांभुळकर, प्रभाकर शहारे, रोशन सोनटक्के, राहुल राऊत, सुनील कांबळे, शंकर मेश्राम, यासह समता सैनिक दलाचे सैनिक आणि सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते.
