जिल्हा परिषद महाविद्यालय वरठी येथे वर्ग दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांची सत्कार व करिअर मार्गदर्शन
दिनांक १९-७-२०२५ शनिवारला जिल्हा परिषद महाविद्यालय वरठी येथे वर्ग दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांची सत्कार व करिअर मार्गदर्शन आणि अवयव दानावर मार्गदर्शन आणि व्यसनमुक्ती वर मार्गदर्शन कार्यक्रम श्री. छत्रपती शिवाजी महाराज सामाजिक बहुद्देशीय मंच वरठी तर्फे घेण्यात आला. यामध्ये वर्ग 10 चे विद्यार्थी कु. रुचिका मरघडे, श्रुती बडवाईक, किर्ती कुंभरे व वर्ग बाराचे विद्यार्थी मन्नत गजभिये, सुबोध मोहतुरे, अमिष भिवगडे यांच्या सत्कार करून करियर मार्गदर्शक श्री रोशनजी गुप्ता सर, अवयव दानावर एकनाथ बांगरे, व्यसनमुक्ती वर मार्गदर्शन करणारे श्री. मिलिंद धारगावे, शेखर मडामे, रवीकुमार डेकाटे, यांचे आणि मुख्याध्यापक श्री. विजयजी हटवार यांचे प्रमुख मार्गदर्शन घेऊन वृक्षरोपणाच्या कार्यक्रम घेण्यात आला. या कार्यक्रमाकरिता मंचाचे श्री. एकनाथजी बांगरे,गणेश क्षिरसागर, देवानंद रंगारी शेखर मडामे, यांनी प्रयत्न केले. या कार्यक्रमाकरिता रवीकुमार डेकाटे, अशोकजी मते, विद्याताई भिवगडे, किरणताई रंगारी, इंदल बडवाईक, धर्मराज पाटील, मोरेश्वर लोहबरे यांनी प्रमुख उपस्थिती दर्शवली. संचालन, वर्षाताई मेश्राम मॅडम, सुनील शेंडे सर आभार प्रदर्शन हरेश समरीत सर यांनी केले.
