BREAKING NEWS:
महाराष्ट्र हेडलाइन

जिल्हा परिषद प्रशासनाची निष्क्रियत्ता सेवानिवृत्त शिक्षकांच्या जीवावर उठली

Summary

जिल्हा परिषद चंद्रपूर मधून माहे मे 2021 या महिन्यात व त्यापुढील महिन्यात सेवानिवृत्त होणारे शिक्षकांचे सेवानिवृत्तीचे आदेश निर्गमित न झाल्यामुळे सेवानिवृत्ती प्रकरण सादर करता येत नसल्याने चंद्रपूर जिल्हा परिषद मधील शिक्षक सेवानिवृत्ती आदेशासाठी वणवण भटकत असल्यामुळे प्रहार शिक्षक शिक्षक संघटनेचे […]

जिल्हा परिषद चंद्रपूर मधून माहे मे 2021 या महिन्यात व त्यापुढील महिन्यात सेवानिवृत्त होणारे शिक्षकांचे सेवानिवृत्तीचे आदेश निर्गमित न झाल्यामुळे सेवानिवृत्ती प्रकरण सादर करता येत नसल्याने चंद्रपूर जिल्हा परिषद मधील शिक्षक सेवानिवृत्ती आदेशासाठी वणवण भटकत असल्यामुळे प्रहार शिक्षक शिक्षक संघटनेचे जिल्हा अध्यक्ष जयदास सांगोडे यांनी मुख्यकार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद चंद्रपूर यांना पत्र लिहून सेवानिवृत्त शिक्षकांचे सेवानिवृत्तीचे आदेश तात्काळ देण्याची मागणी पत्त्राद्दारे केली आहे. महाराष्ट्र राज्य नागरी सेवा अधिनियम 1982 अन्वये सेवानिवृत्त कर्मचाऱ्याचे सेवानिवृत्तीप्रकरण तयार करण्याची जबाबदारी हि कार्यालय प्रमुखांची असून . नियुक्ती प्राधिकारी यांनी दोन वर्षांत सेवानिवृत्त होणाऱ्या कर्मचारी यांचे आदेश निर्गमित करून महाराष्ट्र नागरी सेवा सेवानिवृत्त अधिनियम 1982 अन्वये 6 महिन्यां अगोदर सेवानिवृत्त कर्मचाऱ्याचे प्रकरण सादर करून ज्या दिवशी कर्मचारी सेवानिवृत्त होतो, त्या दिवशी त्याला सेवानिवृत्तीचे लाभ देण्याबाबत शासन निर्णयात नमूद आहे.परंतु शिक्षणाधिकारी प्राथमिक जिल्हा परिषद चंद्रपूर यांनी जिल्हा परिषदच्या सेवेतून मे 2021 ला व त्यापुढील महिन्यात सेवानिवृत्त होणाऱ्या शिक्षकांचे सेवानिवृत्तीचे आदेश आज तारखेला सुद्धा निर्गमित केले नाही त्यामुळे सेवानिवृत्त कर्मचारी सेवानिवृत्तीनंतर मिळणाऱ्या सेवानिवृत्ती वेतन, उपदान,अंशराशीकारण प्रकरण जिल्हा परिषदच्या शिक्षण विभागाकडे सादर करूच शकत नाही.दर दोन वर्षांनी सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांची यादी निर्गमित करणे हि जबाबदारी उपमुख्य कार्यकारी अधिकारी (सामान्य ) यांना मुख्य कार्यकारी अधिकारी यांना एका आदेशानुसार प्रदान केली आहे. जानेवारी 2021 ते मार्च 2021 या कालावधीत सेवानिवृत्त झालेल्या शिक्षकांना जिल्हा परिषद कडून सेवानिवृत्त वेतन मिळाले नाही. तसेच उपदान,अंशराशीकारण रक्कम मिळाली नाही.चंद्रपूर जिल्हा परिषद मध्ये सेवानिवृत्त व मयत कर्मचारी यांना कधीच सहाजासहाजी सेवानिवृत्ती चे लाभ वेळेवर मिळत नसून जिल्हा परिषदचे उंबरठे झीजवावे लागते. शिक्षण विभागाने मे 2021 पासून सेवानिवृत्त होणाऱ्या शिक्षकाच्या नस्ती मध्ये अनेक चुका करून नस्ती सामान्य प्रशासन विभागात पाठवली होती. त्या नस्तीत तृट्या काढून सामान्य प्रशासन विभागाने शिक्षण विभागात परत केली असून आदेश निर्गमित होईपर्यत तो शिक्षक सेवानिवृत्त होऊन घरी जाणार.परंतु आपले सेवानिवृत्त प्रकरण सादर करू शकणार नाही. त्यानंतर त्या सेवानिवृत्ती प्रकरणात जिल्हा परिषद कडून त्रुटी असल्याचे 6 महिन्यानंतर कळविण्यात येईल. सर्व क्लेम मिळायला पूर्ण एक वर्ष लागणार.सन 2019 ला सेवानिवृत्ती होणारे चंदू वनकर सेवानिवृत्त मुख्याध्यापक पं स मूल या शिक्षकांचे भविष्य निर्वाह खात्यात जमा असलेली 15 लाख रुपये अजूनहि मिळाले नाही व गटविमा सुद्धा मिळाला नाही.शासन निर्णयानुसार 6 महिन्यापर्यंतच व्याज दिले जाते. चंदू वनकर याचे दोन वर्षाचे व्याज कोण देणार. संबंधित जबाबदार अधिकारी यांच्यावर कारवाई करणार काय? सप्टेंबर 2020 मध्ये सेवानिवृत्त झालेल्या अनेक शिक्षकांचे भविष्य निर्वाह निधीतील अंतिम जमा रक्कम मिळाली नाही. सन 2017 मध्ये सिंदेवाही पं स मधून सेवानिवृत्त झालेले शिक्षक विनायक बागडे यांना गटविम्याची रक्कमच मिळाली मिळाली नाही तसेच त्याचे प्रकरण कुठे आहे हे सांगायला जिल्हा परिषदचे अधिकारी तयार नाहीत.या सर्व भोंगळ कारभाराला प्राथमिक शिक्षण विभाग जबाबदार असून तेथील अधिकारी यांच्यावर कारवाई केल्याशिवाय प्रकरण निकाली निघणार नाही.सातव्या वेतन आयोगानुसार अनेक सेवानिवृत्त शिक्षकांचे वेतन निश्चित न झाल्याने त्या सेवानिवृत्त शिक्षकांना जुन्याच दराने तुटपुंजे वेतन मिळत आहे. अनेक सेवानिवृत्त शिक्षक त्यासाठी पंचायत समिती व जिल्हा परिषदच्या चकरा मारताना दिसतात. जिल्हा परिषद प्रशासनावर वचक नसल्याने हे सर्व घडत आहे. तरी मे 2021 मध्ये व त्यापुढे सेवानिवृत्त होणारे शिक्षकांचे आदेश तात्काळ निर्गमित करावे. जेणेकरून सेवानिवृत्ती शिक्षकांना जिल्हा परिषदकडे सेवानिवृत्तीनंतरचे लाभ मिळतील. त्या निवेदनाची प्रतिलिपी मुख्यसचिव, प्रधान सचिव, ग्रामविकास विभाग, विभागीय आयुक्त, नागपूर,मुख्यलेखा तथा वित्तअधिकारी, उपमुख्यकार्यकारी अधिकारी ( सामान्य ), शिक्षणाधिकारी (प्राथ ),गटविकासअधिकारी (सर्व ) पं. स यांना पाठविण्यात आले असून सेवानिवृत्तीचे प्रकरण सेवानिवृत्तीच्या महिन्यात सादर केल्यास त्या शिक्षकांना सेवानिवृत्ती वेतन व इतर लाभ केव्हा मिळणार हा बिकट प्रश्न सेवानिवृत्त होणाऱ्या शिक्षकांना पडला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *