महाराष्ट्र हेडलाइन

जिल्हा परिषद अध्यक्षा सौ. संध्या गुरनुले यांची प्राथमिक आरोग्य केंद्र मारोडा येथे भेट कोरोना लसीकरणाला प्रचंड प्रतिसाद, कर्मचाऱ्यांचे केले कौतुक

Summary

चंद्रपूर : आपल्या देशाचे लाडके पंतप्रधान नरेंद्र जी मोदी यांनी कोरोना या रोगावर प्रतिबंध घालण्यासाठी लस काढण्यात यशस्वी झाले. कोरोना लसीकरणाला संपूर्ण भारतभर सुरुवात झाली. सध्या ४५ ते ६० वर्ष वयोगटातील सर्वांना लस उपलब्ध करून देण्यात आली आहे. अश्यातच जिल्हा […]

चंद्रपूर : आपल्या देशाचे लाडके पंतप्रधान नरेंद्र जी मोदी यांनी कोरोना या रोगावर प्रतिबंध घालण्यासाठी लस काढण्यात यशस्वी झाले. कोरोना लसीकरणाला संपूर्ण भारतभर सुरुवात झाली. सध्या ४५ ते ६० वर्ष वयोगटातील सर्वांना लस उपलब्ध करून देण्यात आली आहे. अश्यातच जिल्हा परिषद अध्यक्षा सौ. संध्या गुरनुले यांनी प्राथमिक आरोग्य केंद्र मारोडा येथे भेट दिली.

कोरोना लसीकरणाला प्राथमिक आरोग्य केंद्र मारोडा येथे प्रचंड सुरूवात झाली असून गावातील प्रत्येक वयोवृद्धांना लस मिळावी यासाठी ग्राम पंचायत च्या वतीने दवंडीच्या माध्यमातून प्रचार, प्रसिद्धी व जनजागृती करण्यात आली. जिल्हा परिषद अध्यक्षानी सर्व कर्मचाऱ्यांचे कौतुक करून शुभेच्छा दिल्या.

यावेळी प्रशांतजी समर्थ नगरसेवक मूल, भिकारूजी शेंडे सरपंच ग्राम पंचायत मारोडा, बंडू वाढई माजी सरपंच, श्यामरावजी शेंडे, डॉ. रंजना झाडे वैद्यकीय अधिकारी प्राथमिक आरोग्य केंद्र मारोडा, कपिल बोरावार प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी, अरुणा रामचंद्र दूधकोहर आरोग्य सेविका, प्रमोद कडस्कर चिखली, नरसिंग गनवेनवर भाजपा कार्यकर्ता, इत्यादी उपस्थित होते.

विक्की नगराळे
तालुका
चंद्रपुर
शहर प्रतिनिधी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *