BREAKING NEWS:
महाराष्ट्र हेडलाइन

जिल्हा परिषद अध्यक्षांच्या हस्ते गुंडम येथील पूल व अंगणवाडी बांधकामाचे भूमिपूजन

Summary

गडचिरोली प्रतिनिधी चक्रधर मेश्राम दि ४ एप्रिल २०२१:- महाराष्ट्र राज्याच्या शेवटच्या टोकावर वसलेला छत्तीसगड सिमेलगत गडचिरोली जिल्हयाचे शेवटचे टोक म्हणजेच एटापल्ली. तालुक्यतील घोटसुर ग्रामपंचायत अंतर्गत गुंडम पुल व गुण्डम आंगनवाड़ी बंधकामचे भूमिपूजन जि. प. अध्यक्ष अजय कंकडालवार यांच्या हस्ते करण्यात […]

गडचिरोली प्रतिनिधी चक्रधर मेश्राम दि ४ एप्रिल २०२१:- महाराष्ट्र राज्याच्या शेवटच्या टोकावर वसलेला छत्तीसगड सिमेलगत गडचिरोली जिल्हयाचे शेवटचे टोक म्हणजेच एटापल्ली. तालुक्यतील घोटसुर ग्रामपंचायत अंतर्गत गुंडम पुल व गुण्डम आंगनवाड़ी बंधकामचे भूमिपूजन जि. प. अध्यक्ष अजय कंकडालवार यांच्या हस्ते करण्यात आले.
घोटसूर गुंडाम गावाला जाण्याकरिता पूल नसल्याने गावात जाण्याकरिता अडचण निर्माण होत होती. सदर बाब गाववासीयांनी जि. प. अध्यक्ष अजय कंकडालवार यांना कळवली असता जि. प. अध्यक्षांनी पुल बांधून देण्याचे आश्वासन पूर्ण देऊन पूर्ण करत करत पुलामुळे घोटसुर गुंडम रस्त्याचे थंबलेले काम आता लवकरात लवकर सुरु होणार असल्याचे जि. प. अध्यक्षांनी सांगितले. यावेळी गावकऱ्यांनी सांगितले कि आतापर्यंत कोणताही पदाधिकारी या गावापर्यंत पोहचला नाही व जि. प. अध्यक्षांनी या ठिकाणी पोहचून जनतेचा प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न केला. याबाबत नागरिकांनी जि. प. अध्यक्षांचे अभिनंदन करत कौतुक केले तसेच याठिकाणी अंगणवाडी केंद्राची अत्यंत गरज होती ती सुद्धा मंजून करून भूमिपूजन केले-
यावेळी जि. प. सदस्य संजुभाऊ चरडूके, आविस सचिव तथा सल्लागार प्रज्वल नागुलवार, सल्लागार शंकर काका दासारवार, घोटसूरचे सरपंच साधु कोरामी, माजी सरपंच शिवाजी हेड़ो, कसनसूरच्या सरपंचा कमलताई ठाकरे, माजी सरपंच तथा विद्यमान सदस्य सुनील मडावी, सदस्य विलास गावड़े, सदस्य छाया कोवासे, सदस्य पूसू दुर्वा, सल्लागर प्रशांत गोडशेलवार, सदस्य प्रकाश हीडो, नीलकंठ निकोड़े व समस्त घोटसूर गुंडाम गावकरी व आवीस पदाधिकारी कार्यकर्ते, पाटील भूमिया, पुजारी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *